Thursday, May 23, 2024
Homeग्रामीण वार्ताचंद्रपूर जिल्ह्यात वनप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 20 बळी

चंद्रपूर जिल्ह्यात वनप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 20 बळी

मागील 4 दिवसात वाघाच्या हल्ल्यात 3 नागरिक ठार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

बाेडधा (हळदा)- शेतावर धान कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेतशिवारातील कंपार्टमेंट ११६८ मध्ये 1 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता घडली.सदर घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असुन शेतावर जाऊन धान कसे कापायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (वय ६०) ही महिला आज सकाळी दहा वाजता धान कापायला गेली. दुपारी तीनच्या सुमारास शेतामध्ये असलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले व डाेक्याचा भाग छिन्नविछिन्न अवस्थेत करून या महिलेला शंभर मीटर अंतरावर असलेल्या कंपार्टमेंट ११६८ मध्ये नेले या महिलेच्या साेबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्याने सदर महिलेचा मृतदेह तिथेच ठेवुन वाघ पळुन गेला.

 

सदर घटनेची माहिती गावात हाेताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली माहिती मिळताच दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे,वनक्षेत्रसहाय्यक ए.पी.करंडे घटनास्थळी आपल्या ताफ्यासहित दाखल झाले.तसेच मेंडकी पाेलिस घटनास्थळी दाखल पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.

 

वाघाच्या हल्ल्यात सकाळी गाेऱ्हा जखमी
बाेडधा येथील प्रल्हाद जयदेव हुलके हा युवक बैल शेतात चारण्यासाठी जात असताना वाघाने बाेडधा शेतशिवारातील वनविभागाच्या राेपवनासमाेरच एका गाेऱ्हावर वाघाने हल्ला करून जखमी केले.

 

वाघाच्या दहशतीने परिसरातील नागरिक घाबरले असुन शेती करायची कशी , धानपिक कसे कापायचे असा प्रश्न निर्माण झाला असुन तातडीने वनविभागाने या वाघाांचा बंदोबस्त करावा अशी मागणी हाेत आहे.

वर्ष 2023 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण 20 बळी गेले आहे ज्यामध्ये 19 वाघाच्या हल्ल्यात तर 1 बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!