Monday, May 27, 2024
Homeक्रीडाआप पक्षाच्या बॅनरमुळे चंद्रपुरात 4 वर्षांनी गाजला 200 युनिटचा मुद्दा

आप पक्षाच्या बॅनरमुळे चंद्रपुरात 4 वर्षांनी गाजला 200 युनिटचा मुद्दा

फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम मनपाने केली परत

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेऊनही कर्मचाऱ्यांनी बॅनर काढण्याची कारवाई केली. स्थानिक आमदाराच्या दबावात महानगर पालिका कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने महानगरपालिका परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर स्वतःच दिलेली परवानगी रद्द करीत फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम परत करण्याची नामुष्की मानपावर ओढवली आहे.

 

मागील २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. मतदारांना भूलथापा देऊन विजय मिळविला. मात्र, ४ वर्ष पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झाली नाही. याच घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम आदमी पक्षाने शहरात २०० युनिट बाबत बॅनर लावले.

 

त्यासाठी चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेण्यात आली. शुल्कापोटी ८ हजार रुपये भरले. “200 युनिट” हा मुद्दा घेऊन फिल्मी डॉयलॉग बॅनर शहरभर लागले. सोशल मीडिया आणि माध्यमातून ते प्रचंड वायरल झाले. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांना विजेचा जोरदार झटका बसला. करंट लागल्यागत अवस्था झालेल्या आमदारानी मनपा अधिकाऱ्यांना फोन करून बॅनर काढण्यासाठी दबाव आणला. या बॅनरला महानगरपालिकेने काढून टाकले. या कारवाईवर आम आदमी पक्षाने संताप व्यक्त केला. मनपात जाऊन ठीय्या आंदोलन केले. व काढलेले बॅनर लावायची मागणी लाऊन धरली.

 

आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आमदार किशोर जोरगेवार यांनी 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती, पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. आमदारांनी केवळ भूलथापा दिल्या आहेत. नागरिकांमध्ये या घोषणेमुळे मोठी नाराजी पसरली आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने आमदाराच्या दबावात परवानगी घेतली असतानाही महानगरपालिकेने आमचे बॅनर काढून टाकले. आम आदमी पक्षाच्या आंदोलनामुळे महानगरपालिकेत तणाव निर्माण झाला होता. पोलीसाना पाचारण करण्यात आले.

महानगरपालिकेचे अधिकारी आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत होते. या चर्चेअंती महानगरपालिकेने परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच दिलेली परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याची नामुष्की मनपावर आली आहे.

 

यावेळेस आपचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे,संगठन मंत्री भिवराज सोनी,जिला सचिव संतोष दोरखंडे, जिला उपाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, संगठन मंत्री,संतोष बोपचे,युवा अध्यक्ष प्रशांत सिदुरकर, शहर उपाध्यक्ष सुनील सद्दभयाजी, सिकंदर सागोरे, ऍड तब्बसूम शेख, दिपक बेरशेट्टीवार, शंकर सरदार, पवनकुमार प्रसाद, महेश नन्नावरे, अश्रफ सय्यद,गणेश आडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!