राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची मागणी

News34 chandrapur

चंद्रपूर – राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला असून आता आंदोलक ओबीसी नेत्यांवर हल्ले करीत आहे, ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली त्यांच्या घराची जाळपोळ आंदोलकांनी सुरू केली आहे, मात्र ज्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या विरोधात आंदोलक शांत आहे, सध्या मराठा आंदोलन चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम करीत आहे मात्र हे ओबीसी समाज सहन करणार नाही अशी परिस्थिती राहिली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल बैस यांना केली आहे.

 

मराठा आरक्षणाबाबत राज्यातील अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या, तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर व प्रांतिक तैलिक महासभेचे युवा आघाडी अध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके व आमदार प्रकाश बंब यांच्या बंगला व वाहनाची जाळपोळ आंदोलकांनी केली हे अत्यंत चुकीचे आहे.

 

ज्या जनप्रतिनिधींने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका घेतली त्यांच्या बंगला व वाहनांची जाळपोळ करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, राज्य सरकारने तातडीने हा जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर कलम 302 अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

 

ओबीसी समाजाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे याबाबत कसलाही विरोध केला नाही, मात्र त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका सुद्धा यावेळी तेली समाजाने मांडली आहे.

 

सध्या आंदोलकांनी राज्यात हैदोस घातला असून मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचे काम यांच्यातर्फे सुरू आहे, हे आता थांबवायला हवे, अन्यथा शासनाने योग्य ती सुरक्षा पुरवावी. आंदोलकांची दडपशाही अशीच सुरू राहिली तर संपूर्ण मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, राज्यपाल रमेश बैस यांनी प्रभावीपणे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महासभेचे प्रदेश अध्यक्ष खासदार रामदास तडस यांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले आहे.

 

निवेदन देताना महासभेचे प्रकाश देवतळे, अजय वैरागडे, निलेश बेलखेडे, राहुल क्षीरसागर, छबु वैरागडे, कल्पना बगुलकर उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!