Sunday, April 21, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

चंद्रपूर युवासेनेला युवकांची पसंती

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा युवासेना मध्ये असंख्य युवकांनी 3 नोव्हेम्बरला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

 

चंद्रपूर युवासेनेची सूत्रे हाती घेतल्यावर विक्रांत सहारे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले, युवक व युवतीच्या समस्यांना न्याय सुद्धा त्यांनी आपल्या माध्यमातून न्याय देण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

मागील अनेक महिन्यापासून असंख्य युवक युवासेनेत प्रवेश घेत आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होत, शहरातील असंख्य युवक आज युवासेनेत सामील झाले.

 

यावेळी युवासेना शहर अधिकारी शहबाज शेख, उपशहर प्रमुख संघदीप रामटेके व प्रवेश घेणारे राहुल कोवे, सिधु कोवे, आदेश वाघमारे, यश भडके, मोहित कांबळे, अरबाज खान, तन्मय उमाटे, श्रेयस कांबळे, जय निखारे व आदी युवकांची उपस्थित होती.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!