Thursday, February 29, 2024
Homeचंद्रपूरगांधी चौकात दिलेला शब्द आज तेथेच पुर्ण करता आल्याचा आनंद - आमदार...

गांधी चौकात दिलेला शब्द आज तेथेच पुर्ण करता आल्याचा आनंद – आमदार किशोर जोरगेवार

आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने विद्यार्थीनींना सायकल वाटप, दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वाटप

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – निवडून आल्यानंतर गांधी चौकात विजय सेभेला संबोधित करत असतांना गोर गरिब, गरजु विद्यार्थी, दिव्यांग यांची सेवा करण्याचा संकल्प केला होता. तेव्हा पासून आपण विविध उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी, गोर गरिब नागरिक, दिव्यांग बांधव सामाजात काम करणा-या संघटनांना शक्य ती मदत पोहचवण्याचे काम करत आहोत. आज गांधी चौकात आपण गरजु मुलींना सायकल, दिव्यांग बांधवांना सायकल देत आहोत. त्यामुळे या गांधी चौकातून या वर्गाची सेवा करण्याचा दिलेला शब्द याच चौकात पुर्ण करता आल्याचा अधिक आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने महानगरपालिका पटांगणात सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, तहसीलदार विजय पवार, अजय जयस्वाल, सुर्यकांत खनके, मिलींद गंपावार, श्याम धोपटे, गोपाल मुंधडा, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, आमदार म्हणून मोठा निधी आपण मतदार संघाच्या विकास कामावर खर्च केला आहे. मात्र रस्ते, नाली, सभागृह म्हणजे सर्वसमावेशक विकास नाही. माझ्या मतदारसंघातील गरिब – गरजु, दिव्यांग बांधव यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे हे सुध्दा लोकप्रतिनी म्हणून आमचे काम आहे. काही मित्र मंडळींनी वाढदिवसा निमित्त मदत करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी आपण त्यांना मदत करायची ईच्छा असेल तर या माध्यमातून मदत करण्याची विनंती केली होती. व त्यांनी हा भव्य कार्यक्रम आयोजित केला.

 

आज आपण विविध शाळेतील 100 गरजु विद्याथीनींना सायकल वितिरित केली आहे. तर जवळपास 30 दिव्यांग बांधवांना तिन चाकी सायकल आपण देत आहोत. ही मदत शेवटची बिलकुल नाही. पूढे ही समाजातील या घटकांना त्यांना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले. आज विद्याथीनींना सायकल मिळाली त्यांच्या चेह-यावरचा आनंद हेच आमचे समाधान आहे. आपण शिक्षण क्षेत्रात उल्लेखीय काम करत देशाचे नावलौकीक करावे, आपल्याला शिक्षण क्षेत्रात कोणतीही अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवासा निमित्त दिवसभरच विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाकाली मंदिर येथे श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गणपती मंदिर येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने लाडू तुला कार्यक्रम घेण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular