विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

News34 chandrapur

चंद्रपूर – आज देशाला गरज आहे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांची, जो आपल्या नावासह देशाचे नाव उज्ज्वल करेल. विद्यार्थीच हा देशाचा कणा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या बल्लारपूर महिला तालुका अध्यक्ष अफसान सय्यद यांनी केले.

 

काँग्रेस नेत्या खा. मा.श्रीमंती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 

बल्लारपूर येथील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये नोटबुक वाटप करण्यात आले.

 

पुढे बोलताना ते म्हणाले आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल. त्याशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थी वर्गाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांचे पालन करून समोर गेले पाहिजे. शिका, संघटित रहा, वेळ पडल्यास संघर्ष करावे लागल्यास करा. जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे.

 

यावेळी बल्लारपूर काँग्रेसचे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष गोविंदा पाटील उपरे, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या तालुका अध्यक्ष अफसान सय्यद, कोर्टीमक्ताचे सदस्य मनोज सोयाम, सामाजिक कार्यकर्ते महेश थेरे, वर्षा भोयर, मंदा मडावी, मुख्याध्यापक शंकर यादव, मानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक दहेलकर, शिक्षिका पुष्पा आडे, रत्नमाला मोकासी, शालिनी गावंडे, आलम सर, वनिता आलाम, विलास गवारे, सय्यद, अर्चना धनराज डोंगे, विनोद गवारे, सुनील कोरे, अजय धोतरे, कवळजई जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान, अरविंद सुरजगडे, सिद्धार्थ उंमरे, रविशंकर कोडाम, दिनेश केशकर, ऋषी आलम, पुणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शुभांगी गाजरलावर, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव येरगुडे, शिक्षक भोजराज चंदेलवार, तसेच शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!