Thursday, February 29, 2024
Homeचंद्रपूर ग्रामीणचंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

पोलीस प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर /पोम्भूर्णा – धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे तसेच जर लावलेले गुन्हे मागे घेणार नसाल तर आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन सोमवार पासून तालुका कचेरी समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारला आंदोलकांनी आपला मोर्चा पोलिस स्टेशनच्या समोर वळवून ठिय्या आंदोलन सुरू केलेला आहे.या आंदोलनाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले आहे.

 

धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर ईको – पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी व विविध मागण्या घेऊन ठिया आंदोलन केले होते.त्या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्तावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील ३०७ व ३५३ कलम मागे घेण्यात यावे यासाठी आदिवासी बांधव आणि संघटना आक्रमक झाले आहेत. शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी तहसील व पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.मागील आंदोलनादरम्यान आदिवासी बांधवावर ३०७ व ३५३ कलम लावण्यात आले आहे ते तात्काळ काढण्यात यावे नाही तर आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतले असल्याने प्रकरण चिघळले आहे.

 

मागील आदिवासी बांधवांनी केलेल्या आंदोलनात वनविभाग कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख बंदोबस्त लावला, व काही जणांवर 307 व 353 कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास केला मात्र तपास कार्यात गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी तपासकामी सहयोग केला नाही, त्यानंतर सेशन न्यायालयात अटकपूर्व जामीन रद्द झाला अशी माहिती समोर आली असून आता अटक झाली तर सर्व समाज बांधवांना अटक करा अन्यथा दाखल गुन्हे परत घ्या अशी मागणी घेऊन सध्या पोम्भूर्णा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

 

आदिवासी बांधवांच्या ठिय्या आंदोलन स्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून सध्यातरी पोलीस प्रशासन अत्यंत संयम बाळगून प्रकरण हाताळण्याचे काम करीत आहे.

 

ही बाब योग्य नाही….

 

गुन्हा न्यायालयात गेला की पुढची कायदेशीर बाजू ही न्यायालय बघतो जर ठिय्या आंदोलन करून गुन्हे मागे होणार असेल तर उद्या प्रत्येकजण गुन्हा करीत पोलीस स्टेशनला घेराव टाकत ठिय्या आंदोलन करणार, प्रशासनाला वेठीस धरणे ही बाब योग्य नाही.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular