Friday, June 14, 2024
Homeक्रीडाचंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

चंद्रपूर जिल्ह्यातील कैलास च्या कोंबडा बाजारावर कारवाई साठी पोलिसांना शुभ मुहूर्ताची वाट?

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – काही दिवसांपूर्वी News34 ने चंद्रपुरातील कैलास ने जिल्ह्यातील पर्वतावर सुरू केला कोंबडा बाजार अशी बातमी प्रकाशीत केली होती मात्र त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याची माहिती पुढे आली आहे, चंद्रपूर पोलीस कारवाईचा शुभ मुहूर्ताची वाट तर बघत नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे.

जिल्ह्यातील जिवती येथील भारी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बाबापूर या गावी कैलास चा कोंबडा बाजार थाटात सुरू करण्यात आला आहे.

 

यादिवशी खेळा जुगार

 

आठवड्यातील रविवार, बुधवार व शुक्रवारी हे तीन दिवस जुगाराचे खास आहे, यादिवशी तेलंगणा, व इतर जिल्ह्यातील शौकीन व्यक्ती कोंबडा बाजारात दाखल होत, विविध जुगार खेळत असतात.

 

सुविधा काय?

कोंबडा बाजारात एंट्री झाल्यावर आपल्याला झेंडी मुंडी, कट पत्ता, रमी असे विविध जुगार खेळायला मिळतात, कोंबडा झुंझित हरणाऱ्या कोंबड्याची मेजवानी सुद्धा मिळते, सोबत दारु व चखण्यात नॉन व्हेज ची सुविधा, चंद्रपुरातील कैलास ने जुगार खेळायला येणाऱ्या खेळाडूसाठी चांगली व्यवस्था केली आहे, जुगार खेळायला आल्यावर कुणीही उपाशी पोटी जाऊ नये याची संपूर्ण व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली आहे.

 

रविवार हा दिवस कैलास साठी मोठा दिवस आहे, यादिवशी तब्बल 300 वाहने त्याठिकाणी येतात, वाहने लावायला जागा नसते, मात्र कैलाश च्या उत्तम नियोजनामुळे खेळाडूंना कसलाही त्रास त्याठिकाणी होत नाही हे विशेष.

 

सट्टा किंग चंद्रपुरातील कैलास.…..

कैलास हा चंद्रपूर शहरात राहतो, कैलास ने शहरातील अनेक भाग सट्टा पट्टीने गाजविले आहे, भिवापूर, दुर्गापूर, पडोली असे विविध भागात कैलास ने सट्टा सुरू करीत नावलौकिक मिळविले, आता थेट कोंबडा बाजार सुरू करून त्या बाजाराचा स्वागताध्यक्ष म्हणून कैलास ला मोठा मान मिळाला आहे.

 

ह्या कोंबडा बाजाराबाबत माहिती असून सुद्धा भारी पोलीस काही करीत नाही हे म्हणजे लईचं भारी आहे.

 

सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे, विविध विषयांवर तिथे चर्चा होत आहे मात्र जिल्ह्यातील कोंबडा बाजारावर चर्चा कधी होणार? ह्या कोंबडा बाजारामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची चिन्हे आहे, कारवाई झाली नाही तर चंद्रपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!