News34 chandrapur
बल्लारपुर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, येथे बल्लारशाह रेल्वे विभागाचे मुख्य जंक्शन आहे. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सूचनेवरून बल्लारशाह ते दुर्ग, हावडा, जबलपूर या गाड्यांची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन चर्चा केली, त्यावर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
चर्चे दरम्यान श्रीनिवास सुंचुवार यांनी ट्रेन क्र. 08803 बल्लारशाह-गोंदिया, गाडी क्र. 08801 बल्लारशाह-गोंदिया किंवा ट्रेन क्र. 07819 बल्लारशाह-गोंदिया या तीनपैकी एक ट्रेन दुर्ग जंक्शन पर्यंत वाढवण्याची नितांत गरज आहे, कारण छत्तीसगडमधील कामगार वर्ग मोठ्या संख्येने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात राहतो. बंबळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक डोंगरगडावर येतात.
गाडी क्र. 22620 चेन्नई- बिलासपूर ते हावडा वाढवण्याची विनंती केली कारण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने बंगाली समुदाय स्थायिक आहे. गाडी क्र. 15231 बरौनी-गोंदिया एक्स्प्रेस बल्लारशाहपर्यंत वाढवण्याबाबत विनंती करण्यात आली कारण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिक मोठ्या संख्येने येथे स्थायिक आहेत.
गाडी क्र. 22174 जबलपूर – चांदाफोर्ट पूर्वीप्रमाणे सुरू करून बल्लारशाहपर्यंत वाढवण्याची विनंती, ही गाडी चांदाफोर्ट येथे पोहोचायची आणि एक तासानंतर निघायची.
बल्लारशाहपर्यंतच्या मुदतवाढीचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच गाडी क्र. 08804 गोंदिया_बल्लारशाह बल्लारशाह येथे वेळेवर न पोहोचल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना होणारा त्रास पाहता ही गाडी निर्धारित वळे वर चालवण्याची गरज आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दक्षिण पूर्व मध्य रेलवे चे मंडल रेल प्रबंधक सौ सुनीता त्रिपाठी, सीनियर डीसीएम दिलीप सिंह अन्य अधिकारी उपस्थिति होते.
या शिष्टमंडळात श्रीनिवास सुंचूवार यांच्यासह ज्ञानेंद्र आर्य यांचा समावेश होता.