Friday, June 14, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपूर मनपाच्या शाळेचे व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू करा - आम आदमी...

चंद्रपूर मनपाच्या शाळेचे व सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू करा – आम आदमी पार्टी

कामे तात्काळ पूर्ण करा - आप चा मनपाला इशारा

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक प्रभागांमध्ये महानगरपालिकेची शाळा आहे. त्यापैकी काही शाळा खूप दयनीय अवस्थेत असून आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत. अशा या शाळेमध्ये, शाळेचे छत कोसळून केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम आदमी पक्षाच्या वतीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना तात्काळ निधी उपलब्ध करून शाळेचे तसेच सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याबाबत एक महिन्याचा अलटीमेटम देण्यात आला.

अशीच शाळा इंदिरानगर प्रभागामधील आम आदमी पक्षाचे युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे यांनी तर डॉक्टर आंबेडकर नगर प्रभागातील सिद्धार्थ नगर येथील शाळा आणि जूनोना चौक येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तात्काळ करणेबाबत आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक वर्ष आधीच याबाबत निवेदनातून सुचवून दिल्या होत्या. परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारचे कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा इशारा देण्यात आला.

 

यावेळी आम आदी पक्षाचे वरिष्ठ नेते सुनिल मुसळे, जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, संघटन मंत्री भिवराज सोनी, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, सूनील सतभय्या, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे म्हणाले की, “शहरात रहदारीच्या ठिकाणी शौचालय नसणे हे स्वच्छ भारत मिशन ला मोठा धक्का आहे. जूनोना चौक हे शहरातील एक प्रमुख चौक आहे. या चौकात हजारो लोकांची वर्दळ असते. मात्र, या चौकात कोणतेही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे शहरातील स्वच्छता देखील बिघडते. आम्ही महानगरपालिकेकडून तात्काळ या चौकात सार्वजनिक शौचालय बांधण्याची मागणी करतो.”

 

यावेळी बोलताना महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे म्हणाले की, “शहरात अनेक महानगरपालिकेची शाळा आहेत. त्यापैकी काही शाळा खूप दयनीय अवस्थेत आहेत. शाळेचे छत कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. आम्ही महानगरपालिकेकडून या शाळांचे तात्काळ नूतनीकरण करण्याची मागणी करतो.”
आम आदमी पक्षाच्या या अलिमेटममुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आता या प्रश्नांवर तातडीने कारवाई करावी लागणार आहे, हे विशेष.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!