चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्ह्यातील अवैध धंदे आजही छुप्या पध्दतीने सर्रासपणे सुरू आहे, सुगंधित तंबाखू, सट्टा, कोळसा चोरी असो मात्र आता चंद्रपुरातील “कैलास” ने चक्क जिल्ह्यातील “पर्वतावर” कोंबडा बाजार सुरू केल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.

 

2 वर्षांपूर्वी चंद्रपुरात तब्बल 8 ते 9 कोंबडा बाजार सुरू होते, यामध्ये जुगाराचे खेळ सर्रास बघायला मिळत असे, मात्र पत्रकारांच्या सतत वृत्ताने पोलिसांना ते कोंबडा बाजार बंद करावे लागले होते, मात्र आता चंद्रपुरातील ” सट्टा किंग” “कैलास” ने थेट जिवती येथील पर्वत गाठत कोंबडा बाजार सुरू केला.

 

कुठे भरतो जुगारांचा मेळा?

 

चंद्रपूर जिल्ह्यातील पर्वतांच्या रांगा असलेलं तेलंगणा व महाराष्ट्र सीमेला जोडणारे जिवती तालुक्यातील मौजा भारी समोर बाबापूर याठिकाणी हा बाजार भरतो.

 

याठिकाणी जायचं कसं?

 

राजुरा वरून वाकडी गावी आलं की उजव्या दिशेवरून सरळ 8 किलोमीटर अंतर गाठून भारी येथे जायचं, त्याठिकाणी कैलास आपल्या माणसांसोबत आपलं स्वागत करण्यास उत्सुक असतो.

 

कोण आहे कैलास?

 

चंद्रपूर शहरात राहणारा कैलास मागील अनेक वर्षांपासून सट्टा पट्टी चालवितो, पोलिसांना याबाबत जाणीव आहे, 2 वर्षांपूर्वी त्याने दुर्गापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा पेंडाल टाकत सट्टा व जुगार सुरू केला होता, मात्र News34 च्या बातमीनंतर त्याचा जुगार दुर्गापुरातून हटला, आता त्याने थेट जिवती तालुक्यात महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर कोंबडा बाजार सुरू केला आहे, कारण सीमेच्या पलीकडील नागरिक मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी त्याठिकाणी येत असतात.

 

आधी सोशल क्लब च्या नावाने रमी क्लब तर सुरूच झाले आहे आता त्यामध्ये कोंबडा बाजाराने भर दिल्याने जुगार प्रेमींना चांगली पर्वणी मिळाली आहे.

 

आपल्या कोंबडा बाजारात जायचं असेल तर आठवड्यातून बुधवार, शुक्रवार व रविवार हे 3 दिवसात जावे, बाकी उर्वरित दिवस “कैलास” ने सुट्ट्या घोषित केल्या आहे, कैलास सोबत चंद्रपूर व तेलंगणा येथील काही पार्टनर सोबत असल्याची माहिती आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!