अमृत अर्धवट योजनेचं करायचं काय?

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील डॉ. अंबेडकर, इंदिरानगर, भानापेठ, जलनगर, अपेक्षा नगर या प्रभागात अमृत योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी महागडे टँकर आणावे लागत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने महानगरपालिकेला तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

 

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेत निवेदन देण्यात आले. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, बबन काळे, योगेश्वर काळे, श्याम रहांगडाले, विजू आत्राम, चंद्रसेन पटले, विवेक दापेवार, लीला शेंडे, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

निवेदनात म्हटले आहे की, अमृत योजनेचे काम 2023 च्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे. ज्या ठिकाणी पाईप लाईन दिलेली आहे अशा सर्व ठिकाणी तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!