आमदार जितेंद्र आव्हाड बाबत विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांचं मोठं विधान

News34 chandrapur

चंद्रपूर – निधी वाटपावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्ष नेत्याला टोला लगावला होता त्याबाबत आज विश्रामगृहात माध्यमप्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतला : आव्हाड भांबावले आहेत, पागल झाले आहेत….ही प्रतिक्रिया आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची.

 

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी श्रीखंड पुरी खाल्ली, असा आरोप विकास निधी वाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर वडेट्टीवार उसळले. ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव दिले, त्यांना थोडाफार निधी मिळाला. पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे यांनाही निधी मिळाला. मग स्वपक्षाच्या नेत्यांवर ते आरोप का करीत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

 

युती धर्मातील या दोन नेत्यांनी एकमेकांविरुद्ध प्रतिक्रिया दिली आता या प्रतिक्रियेचे काय पडसाद पळणार हे लवकरच कळेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!