चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

News34 chandrapur

चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर पासून सुरू झाला असून अन्नत्याग आंदोलनासोबत साखळी उपोषण सुरू केले असून थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी चिमूर येथे रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

 

राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूर च्या वतीने विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रविंद्र टोगे यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आंदोलनातील मागण्या संदर्भात बैटक घेऊन मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपूर येथे येऊन आश्वासन देत उपोष्ण मागे घेण्याची विनंती केली.

 

दोन महिन्याचा कालावधी होऊन सुधा आश्वासनाची पूर्तता न झाल्याने चिमूर येथे अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व ओबीसी युवा कार्यकरते अजित सुकारे यांनी 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले. अन्नत्याग उपोष्णसोबत 8 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले. तरी सुधा शासन दखल घेत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने करण्यात आले.

 

आज दिनांक 11 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय चिमूर समोर रास्ता रोखो आंदोलन करून चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्ग बंद केला. चिमूर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र होत असून लवकरात लवकर शासनानी दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!