News34 chandrapur
चंद्रपूर/घुग्घुस – घुग्घुस शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरट गावाजवळ 10 डिसेंबर च्या रात्री रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या ट्रक ला मागून दुचाकीने धडक दिली, या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला.
31 वर्षीय विजय श्रवण साहू रा. घुग्घुस निवासी असे मृतक दुचाकी चालकाचे नाव आहे, तो ट्रक चालक असल्याची माहिती आहे, कामावरून तो वणी येथून आपल्या घरी घुग्घुस येथे परत येत होता.
रात्री 10 वाजताच्या सुमारास दुचाकी वाहन क्रमांक MH34BC5144 ने विजय आपल्या गावी कामावरून परत येत होता, पुरट गावाजवळ रस्त्याच्या मध्ये शाह कोल कंपनीचा ट्रक क्रमांक MH34AB6710 बिघाड झाल्याने उभा होता, मात्र ट्रक ला मागे लाईट नसल्याने विजय ला रस्त्याच्या मध्ये उभा असलेला ट्रक दिसला नाही त्यामुळे त्याची दुचाकी सरळ ट्रक मध्ये घुसली.
या धडकेत विजय चा जागीच मृत्यू झाला, अपघात झाल्यावर विजय चा मृतदेह ट्रक च्या मागील बाजूस पडला होता, सकाळच्या सुमारास नागरिक बाहेर फिरायला निघाले असता त्यांना विजय चा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली, पहाटे 4 वाजता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उचलत पंचनामा केला.
चारचाकी वाहन असो की ट्रक याला साधा बोल्ट नसला की RTO विभाग तात्काळ चालान मारत मात्र सध्या अवजड वाहने व नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई ही नाममात्र होत आहे, शाह कोल कंपनीचा ट्रक मध्ये बिघाड झाल्याने वाहन चालकाने ट्रक रस्त्याच्या मध्ये उभा केला, त्या ट्रक ला इंडिकेटर, टेल लाईट नव्हते जर हे लाईट ट्रक ला असते तर हा अपघात घडला नसता.