Marathi News
चंद्रपूर – डिसेंम्बर महिन्यात चंद्रपुरातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या भव्य आयोजनात कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली होती, मात्र ज्याठिकाणी ही भव्य स्पर्धा आयोजित केली क्रीडा संकुलाचे वीज बिल क्रीडा विभागाकडून भरण्यात आले नसल्याने 15 जानेवारीला महावितरण ने क्रीडा संकुलाची बत्ती गुल केली.
क्रीडा संकुलाचे वीज देयक भरण्यासाठी चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुलात भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेने भीक मांगो आंदोलन केले, यावेळी डॉ. राकेश गावतुरे सहित अनेकांनी भीक मांगो आंदोलनात सहभाग घेतला.
शासनाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता, मात्र नोव्हेंम्बर व डिसेंबर महिन्यातील तब्बल 2 लाख रुपयांच्या वरती वीजबिल भरण्यात आले नव्हते, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी या स्पर्धेचा जोमात प्रचार केला, जिल्ह्यात सर्वत्र बॅनर व पोस्टरबाजी करण्यात आली.
इतका पैसे प्रचारावर खर्च केल्यावर शासनाकडे वीज बिल भरण्यास पैसे नव्हते ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी स्वतःच्या नावावर केलेल्या प्रचाराची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होती, मात्र 15 जानेवारीला महावितरणने आपल्या कामात प्रामाणिकपणा दाखवीत क्रीडा संकुलची बत्ती गुल केल्याने संपन्न आयोजनाला गालबोट लागले.
सरकारकडे वीजबिल भरण्यास पैसे नसल्याने भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेने यावर पर्याय शोधत क्रीडा संकुलात भिकमांगो आंदोलन केले.
आंदोलन डॉक्टर राकेश गावतुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आणि या आंदोलनात सोनल भगत, सोमेश्वर पेंदाम, अरविंद भटकर, श्रीयुत भांडवले, विजय मुसळे, मकरंद खोब्रागडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.