अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

News34 chandrapur

चिमूर : – गुणवंत चटपकार

11 जानेवारी रोजी सायंकाळी ०७:३० ते ०८:३० चे सुमारास उपविभागीय अधिकारी घाडगे व तहसीलदार राजमाने यांचे मार्गदर्शनात तलाठी कालिदास तोडासे, चंद्रकांत ठाकरे, प्रसाद गोडघासे, प्रविण ठोंबरे व कोतवाल अकिब शेख यांनी अवैधरित्या रेतीने भरलेली मुकेश दडवे शंकरपूर तसेच पवन गायकवाड किटाळी मक्ता यांचे दोन ट्रॅक्टर वाहने मौजा मेटेपार – कवडशी डाक येथे पकडून तहसील कार्यालय चिमूर येथे जमा करण्यात आले.

 

तसेच दिनांक.१२/०१/२०२४ ला मध्य रात्री १२ ते १२:३० वाजताच्या सुमारास नेरी उसेगाव च्या मधोमध असलेल्या पांदण रस्त्याच्या काही अंतरावरील उमा नदी पात्रात सत्ताधारी पक्षाच्या प्रतिष्ठित महिलेचे दोन रेतीने भरलेले ट्रॅक्टर तलाठ्यांच्या पथकाने पकडले असता आर्थिक चिरीमिरी करून दोन्ही ट्रॅक्टर हेतुपुरस्सर सोडून दिल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर चिमूर तालुक्यात सुरू आहे.

 

यामुळे रेतीमाफियांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.मोठ्यांचे ठेवायचे झाकून आणि छोट्यांचे बघावे वाकून या म्हणीप्रणे हि गत या महसूल अधिकाऱ्यांची झालेली दिसून येत असल्याने रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!