Thursday, February 29, 2024
Homeचंद्रपूर ग्रामीणग्राम पंचायतींना घाटातुन रेतीविक्री करण्याचा अधिकार द्या - माजी नगरसेवक टहलीयानी यांची...

ग्राम पंचायतींना घाटातुन रेतीविक्री करण्याचा अधिकार द्या – माजी नगरसेवक टहलीयानी यांची मागणी

महसूल मंत्र्याकडे माजी नगर सेवक मोती टहलियानी यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

गुरू गुरनुले

मुल – महाराष्ट्रात वारंवार रेती तस्करी (चोरी) मोठया प्रमणात होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते व वारंवार मिडीया मध्ये (वृत्तपत्रात) बातम्या प्रकाशीत होत असतात. हि बाब १०० टक्के खरी असून या बाबत शासनाचे दिरंगाईचे धोरण असल्यामूळे रेतीचे घाट वेळेवर लिलाव होत नाही. सध्याच्या वाढत्या बेरोजगारीमुळे कित्येक सुशीक्षीत युवकांनी आपला व्यवसाय करण्याचे हेतूने बँकेचे कर्ज घेवून ट्रॅक्टर ट्रक टिप्पर इत्यादी वाहन कर्जा वर घेतले आहेत.

 

अश्या परीस्थतीत त्यांना वाहतूक करण्याकरीता रेती उपलब्ध न झाल्यास त्यांचे बँकेचे कर्जाचे हप्ते सुध्दा थकीत होत आहेत. दुसरी कडे लपून छपून रात्रौच्या वेळेस रेतीची चोरी होत असते त्या मध्येच अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढलेले आहेत.व सबंधीत महसूल अधिका-यांशी मारझोड, झगडे तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. व महाराष्ट्र शासनाने सुध्दा चोरीच्या गाडीवर दंडात्मक रक्कम अतिशय जास्त प्रमाणात ठरवलेली आहे.

 

ही दंडात्मक रक्कम भरायची असल्याने रक्कम जुळवा जुळवी च्या नादात काल एका ट्रॅक्टर मालक युवकाचा अपघात होऊन मृत्यू झाला ही घटना ताजी आहे. ट्रक्टरवर १० हजार, ६ चाकी ट्रकवर २५ हजार, टिपर (डम्पर) यावर ५० हजार अश्या रकमेचे दंड ठेवल्यास सोयीचे होईल अन्यथा सर्वात उत्तम उपाय घाट ज्या ग्रामपंचायतीच्या हदीत येत असेल त्यां ग्रामपंचायतीचे ट्रक्टर ५००/- रूपये ६चाकी ट्रक २००० रूपये टीपर (डॅम्पर) ५००० हजार रूपये अश्या पध्दतीने केल्यास रेतीची तस्करी (चोरी) होणार नाही व त्या त्या ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा साधन निर्माण होईल.

 

कारण ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. आज बहूतांश ग्रामपंचायतीची अवस्था सुध्दा उत्पनाच्या बाबतीत हलाखीची आहे. पिण्याचे पाण्याचे व पथदिव्याचे बिल भरू शकत नाही अश्या परीस्थतीत ग्रामीण भागात पथदिवे बंद पिण्याचे पाणी १५,१५ दिवस पर्यंत बंद असतात म्हणून आपणास नम्र विनंती केली आहे. या अत्यंत महत्वाचे बाबीकडे त्वरीत लक्ष घालून सामान्य नागरीकांना तसेच बेरोजगार युवकांना गाडयांना काम मिळेल व महसूल विभागाच्या भ्रष्टाचारावर आळा बसेल, असे सामान्य जनतेचे मत आहे.

 

हि विनंती देखील लेखी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व माजी नगर सेवक मोती टहलियानी यांनी महसूल मंत्री नाम.राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली असून निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविले आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular