News34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल – महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री स्व.मा.सा. उर्फ दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता तालुका काॅंग्रेस कमिटी मूल तर्फे काॅंग्रेस नेते मान .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थित पदाधिकारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.
मुख्यमंत्री स्व.दादासाहेब कन्नमवार यांनी आपल्या कार्यकाळात विदर्भ व महाराष्ट्रात अनेक विकास कामे करुन शहरी माणसांसोबत ग्रामीण माणसे जोडण्याचे कार्य कन्नमवारजीनी केले. असे विचार काँग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी आपल्या मनोगता मधून व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी ज्येष्ठ कांग्रेस पदाधिकारी बंडू भाऊ गुरनुले यांनी त्यांच्या अल्प काळात स्व.कन्नमवार यांनीच चंद्रपूर व भंडारा येथे डिफेन्स उद्योग निर्माण करुन अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. म्हणून ते लोकनेते झाले असे मत व्यक्त केले. तर स्व.मा.सा.कन्नमवार यांनी अतिशय गरिबीतून व प्रतिकूल परिस्थितीतून वर्तमापत्र वाटून आपल्या जीवन कार्याला सुरुवात करुन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले असे मनोगत कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कृषी बाजार समिती सभापती रकेश रत्नावार यांनीही त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व कांग्रेस पक्ष वाढीसाठी उपस्थित सर्वांनी मेहनत घ्यावी असे सूचित केले. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले तर आभार महिला काँग्रेसच्या सचिव शाम्लता बेलसरे यांनी मानले.
कार्यक्रमाला माजी तालुका अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, माजी उपसभापती व संचालक संदीप कारमवार, संचालक किशोर घडसे, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, कोसंबी ग्राम पंचायत सरपंच रवींद्र कामडी, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, सेवादलाचे संदीप कटकुरवार, युवक काँग्रेसचे विष्णू सादमवार, गंगाधर घुगरे, मनोज आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.