Tuesday, February 27, 2024
Homeचंद्रपूरसंविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आमची - विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आमची – विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

चंद्रपूर येथे श्रीमंत देवाजीबापु खोब्रागडे यांची 125वी जयंती समारोह

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी तुम्हा आम्हाला गुलाम बनवून आपल्यावर राज्य केल होत. मात्र आता देशात आता एका विशिष्ट विचारधारेचे गुलाम बनविण्याचे काम सुरू असुन हे प्रचंड विघातक आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या सर्वांना संविधानाने बहाल केला आहे. एकंदरीत आपल्या सर्वांचे रक्षण करणाऱ्या संविधानाचा कवच तोडण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. पण आपल्याला तो प्रयत्न हाणुन पाडायचा आहे. कारण संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आमची असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले.

 

चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित श्रीमंत देवाजीबापु खोब्रागडे यांच्या 125व्या जयंती निमित्त आयोजित प्रबोधन सभा कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन नेते अशोक निमगडे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील आंबेडकरी विचारवंत रंजित मेश्राम व भिमराव वैद्य हे हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून प्रविण खोब्रागडे, अॅड. राम मेश्राम, रोहीदास राऊत, मारोतराव खोब्रागडे, नंदु खणके, दौपदा डोर्लीकर यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देवाजीबापु खोब्रागडे हे चंद्रपूरातील एक धनाढ्य व्यक्तिमत्त्व होते. पण त्यासोबत त्यांच्या सामाजिक बांधिलकीची श्रीमंती मोठी होती. म्हणूनच त्यांना चंद्रपुरचे पहीले आमदार, बल्लारपूरचे पहीले नगराध्यक्ष होण्याचा बहुमान प्राप्त झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याच्या प्रारंभापासून त्यांच्या महापरिनिर्वाण पर्यंत ते निष्ठेने सोबत राहिले.
त्यांनी आपला मुलगा राजाभाऊ खोब्रागडे यांना बॅरिस्टर बनवून बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी आदेशित केले. एकंदरीत खोब्रागडे पितापुत्रांनी बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपुरात 16 आॅक्टोंबर 1956 रोजी धम्मदीक्षा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवाजीबापु खोब्रागडे हे होते. त्यावरून त्यांची महानता अधोरेखित होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular