News34 chandrapur
चंद्रपूर – 25 जानेवारीला युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती.
शिवा च्या हत्येनंतर सरकारनगर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, पोलिसांनी वेळेवर त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. Justice for shiva wazarkar
एक क्षुल्लक वाद आणि त्या वादातून शिवा वर 8 जणांनी हल्ला केला, आधी पोटात चाकू खुपसला नंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र तोवर शिवा चा मृत्यू झाला होता.
शिवा च्या पोटात चाकू खुपसणारा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा हिमांशू कुमरे होय, चाकू चा वार झाल्यावर शिवा जमिनीवर कोसळला त्यावेळी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणारे स्वप्नील काशीकर, रिजवान पठाण, चैतन्य आसकर, नाजीर खान, रोहित पितरकर, सुमित दाते अन्सार खान हे होते.
पोलिसांनी या प्रकरणी सर्व 8 आरोपीना अटक केली आहे, हिमांशू ने शिवा ला तुझ्या वडिलांची औकात काय? 300 रुपये रोजीने जाणारा तुझा बाप असे हिनवले होते, त्या कारणावरून हे हत्याकांड घडले. Shivsena chandrapur
मात्र ज्याप्रकारे हे हत्याकांड घडलं त्यावरून सर्व नियोजनबद्ध पध्दतीने कट रचून घटना घडविण्यात आली असा आरोप शिवा च्या कुटुंबानी केला आहे.
शिवा च्या कुटुंबाची पालकमंत्री मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते, सर्व आरोपीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
29 जानेवारीला शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक येथे शिवा ला सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आली, यावेळी आरोपीना फाशी ची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
घटनाक्रम काय?
25 जानेवारीला शिवा च्या मोबाईल वर हिमांशू ने कॉल करीत त्याच्या वडीलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले, आणि वाद चिघळला, शिवा याबाबत हिमांशू ला जाब विचारण्यासाठी गेला, सरकार नगर येथील शिवसेना प्रणित वाहतूक सेनेचा माजी पदाधिकारी स्वप्नील काशीकर याच्या कार्यालयासमोर वाद सुरू झाला.
हिमांशु ने तब्बल 20 ते 40 युवकांचा घोळका जमवून ठेवला होता, शिवा आपल्या काही सहकाऱ्यासोबत त्याठिकाणी हिमांशू ला जाब विचारायला गेला, आधी बाचाबाची त्यांनतर शिवा ने हिमांशू च्या कानाखाली लावली आणि लगेच हिमांशू ने धारदार चाकूने शिवा वर हल्ला केला, या हल्ल्यात शिवा ठार झाला.
पोलिसांनी ताबडतोब कारवाई करीत 8 आरोपीना अटक केली, मात्र पोलीस कस्टडी मध्ये असताना पोलिसांनी आपली मैत्री कायम ठेवत आरोपीना VIP ट्रीटमेंट दिली, ही बाब वरिष्ठांना कळताच त्यांनी तात्काळ काही कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.
Vip ट्रीटमेंट ही आरोपीसाठी काही नवी नव्हती, याआधी स्वपिल काशीकर ने गोंडपीपरी येथील कुलथा नदीच्या घाटावर स्थानिक सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्ष सहित गावकऱ्यांना मारहाण केली होती, त्यावेळी स्वप्नील काशीकर व इतर आरोपीवर एट्रोसिटी व प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विविध कलम दाखल झाले होते, विशेष बाब म्हणजे गोंडपीपरी चे तत्कालीन ठाणेदार यांच्याशी त्यावेळी सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की स्वप्नील काशीकर हा फरार आहे, आम्ही त्याच्या मागावर असून लवकर तो पोलीस कस्टडी मध्ये असेल असे सांगितले होते, मात्र आरोपी काशीकर याचा मोबाईल तेव्हा सुरू होता, पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही आणि सदर गंभीर गुन्ह्यात तो महिन्याभरात जामिनावर बाहेर आला होता.
काशीकर याची पोलिसांसोबत चांगलीच मैत्री होती, याबाबत News34 कडे पुरावे सुद्धा उपलब्ध आहे.
गंभीर गुन्ह्यात आरोपी सहज सुटतो, सामान्य नागरीक अश्या गुन्ह्यात अडकल्यावर त्याला आत गेल्याशिवाय पर्याय नाही, मात्र काहींचा अपवाद वगळता.
जर काशीकर या गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला नसता तर आज हे हत्याकांड कदाचित घडले नसते.
यामध्ये दोष द्यायचा कुणाला? ज्याप्रकारे आज राजकीय क्षेत्रात गुंड पक्षप्रवेश करीत आहे, त्या पद्धतीने आज संघटित गुन्हेगारी घडत आहे, भाई ने बोल दिया तो काम करना पडेगा अशी अवस्था आज तरुणाईची झाली आहे.
मागचा पुढचा विचार न करता तरुणाई काहीपण करायला तयार असते ही सुरुवात काही वर्षांपूर्वी चंद्रपुरात सुरू झाली होती व आजही ती सुरूच आहे. आज शिवाच्या मारेकऱ्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली मात्र या नेत्यांनी कधीतरी शहरात वाढत असलेल्या संघटित गुन्हेगारीला विरोध केला काय? यावर सामान्य नागरिकांना एकदा तरी विचार करायला हवा.
शिवा च्या मारेकऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी होत आहे, मात्र तो कायदा काय आहे हे आपण जाणून घेऊया…
टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर 1999 मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) म्हणजेच ‘मोक्का’ कायदा बनवलाय.
हा कायद्याचा वापर कधी केला जातो?
गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
मोक्का कधी लावला जातो?
गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलीसांकडून प्रथम समज दिली जाते. पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॅार्डवर येतो. आरोपीवर अटकेची तसच नंतर तडीपारीचीही कारवाई होते. अशा आरोपींना अटक केली जाते. तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलीसांना मोक्का अंतर्गत कारावाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
कोणावर मोक्काची कारवाई होते ?
हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो. मोक्का लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो. तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या 10 वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे. पोलीसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.
मर्डर, खंडणी, 307, दरोडा, खंडणीचा प्रयत्न, घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी अवश्यक आहे. ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे. अशा गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार, आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते.
शिक्षा काय?
मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. भारतीय दंड विदान संहीतेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच सिक्षा मोक्काच्या कलम 3 (1) नुसार देता येईल. ही सिक्षा किमान 5 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते. त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यांतचा असतो. तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे. संघटीत गुन्हेगारी करुन जर आर्थिक फायदा घेतला जात असेल कींवा टोळी तयार करुन जर गुन्हेगरी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली आहे.