News34 chandrapur
चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक निवासी आश्रम शाळेतील वर्ग 7 वि मध्ये शिकणारी 12 वर्षीय मिताली केशव कोंडागुर्ले चा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.
मृतक विद्यार्थिनी ही गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली गावातील निवासी आहे, विशेष बाब म्हणजे शाळेतील प्रबंधकाने मिताली चा मृत्यू झाल्यावर सदर बाब तिच्या कुटुंबाला सांगितली. Residential Ashram School
मागील 6 दिवसापासून मिताली ची प्रकृती बरी नव्हती, मात्र शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले, 31 जानेवारीला शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात मिताली ने सहभाग घेतला होता, सोमवारी कार्यक्रमाची तयारी करीत असताना मिताली अचानक कोसळली, त्यानंतर तिला प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले, त्यानंतर मूल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला चंद्रपूर रेफर केले, मात्र चंद्रपुरात पोहचण्याआधी वाटेत मिताली चा मृत्यू झाला.
याबाबत शाळेतील मुख्याध्यापक यांनी कुटुंबाला कसलीही माहिती दिली नाही, मिताली चा मृत्यू झाल्यावर तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली, ही बाब संदेह उपस्थित करणारी आहे.
याप्रकरणात शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शाळेतील शिक्षकावर कारवाई करीत शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
शाळा व्यवस्थापनाने मिताली च्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले, याबाबत आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती गिर्हे यांनी दिली.
विशेष म्हणजे ही आश्रमशाळा चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाजप नेत्या संध्या गुरनुले यांची आहे, त्यामुळे सदर प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली गेली.
मिताली चे शवविच्छेदन झाल्यावर आई-वडील गावी मृतदेह नेत असताना त्याठिकाणी चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत दाखल झाले, आधीच मुलगी गेल्याचा कोंडागुर्ले दाम्पत्याला धक्का पोहचला होता आणि त्यामध्ये पोलीस निरीक्षकांनी गडचिरोली जिल्ह्यातील छोट्याशा गावातून मुलीचा मृतदेह नेण्यासाठी दाखल झालेल्या नातेवाईकांना निघा इथून म्हणून त्यांना दम दिला, मुलीचा मृत्यू कसा झाला? त्याबाबत कुटुंबाला माहिती नाही आणि पोलीस निरीक्षकाच्या अश्या वागण्याने खाकी ची माणुसकी संपली की काय? असा प्रश्नचिन्ह यावेळी उपस्थित होतो.
याबाबत संस्था अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेची चूक नसल्याचे सांगितले.
हलगर्जीपणा केला नाही : संध्या गुरनुले
याबाबत आश्रमशाळेच्या संस्थेच्या अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही घटना दुर्दैवी असून यात हलगर्जीपणा बाळगला नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलीची तब्येत बरी नव्हती तेव्हा तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. औषध दिल्यावर तिच्यात सुधारणा झाली होती. यानंतर सोमवारी नृत्याचा सराव करताना तिला चक्कर आली. तिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले मात्र वाटेत तिचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबाला देण्यात आली होती. मात्र मृत्यूचे नेमके कारण हे शवविच्छेदन अहवालातुनच समोर येणार आहे, असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणी मूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.