Chandrapur Acb : शेतकऱ्याला लाचेत मागितले 20 किलो तांदूळ, चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा नवा प्रकार

News34 chandrapur

चंद्रपूर – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 फेब्रुवारीला 2 लाचखोरांना वेगवेगळ्या कारवाईत अटक केली आहे.

 

विशेष बाब म्हणजे एका प्रकरणात लाचेच्या रकमेसह 20 किलो तांदळाची मागणी करण्यात आली आहे.

पहिल्या कारवाईत राजुरा तालुक्यातील शेतकरी याने शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंपाची व्यवस्था केली होती, मात्र सदर पंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा असण्याची गरज असते. Chandrapur acb

 

फिर्यादी व इतर शेतकऱ्यांचे शेत हे विरुर महावितरण कार्यालय अंतर्गत येते, मात्र विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचे काम वरिष्ठ तंत्रज्ञ उपविभाग राजुरा शालेंद्र देवराव चांदेकर यांच्या अंतर्गत येते. Corruption free society

 

 

विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवायचा असेल तर चांदेकर यांनी फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना प्रत्येकी 20 किलो तांदूळ व 1500 रुपये असे एकूण 7 हजार 500 रुपयांची मागणी केली होती. Fight against corruption

 

पैसे देण्याची इच्छा नसलेल्या फिर्यादीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत फिर्याद नोंदवली, 16 फेब्रुवारीला चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सापळा रचत 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शालेंद्र चांदेकर यांना अटक करण्यात आली, आरोपी विरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात ग्राम पंचायत कार्यालय झिलबोडी तालुका ब्रह्मपुरी येथील ग्रामसेवक (सचिव) पुरुषोत्तम यशवंत टेम्भुर्णे 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. Anti corruption

 

फिर्यादी हे ठेकेदारीचे काम करतात, जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत 15 व्या वित्त आयोगामधून वर्ष 2021 ते 2022 दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शौचालय, मुतारी, घर बांधकाम व अंगणवाडी शौचालय, किचन शेड व मुतारीचे काम केले होते.

त्या कामाचे फिर्यादी यांना 3 लाख 90 हजार रुपये ग्रामसेवक टेम्भुर्णे यांनी धनादेश द्वारे दिले होते, कामाचा मोबदला म्हणून ग्रामसेवकाने फिर्यादी यांना 15 हजार रुपयांची लाच मागितली, मात्र फिर्यादी यांना पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार नोंदविली.

 

तक्रारीची पडताळणी झाल्यावर चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 फेब्रुवारीला सापळा रचला, तडजोडीअंती ग्रामसेवक टेम्भुर्णे यांनी 10 हजार रुपये मागितले, लाचेची रक्कम स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात अटक करण्यात आली.

 

लाच घेणाऱ्यांपैकी एकाने शेतकऱ्याकडून 20 किलो तांदूळ – ऐवजी असामान्य प्रकारची लाच मागितली होती.  या घटनेमुळे भ्रष्टाचाराची विविध रूपे असू शकतात आणि काही व्यक्ती वैयक्तिक फायद्यासाठी त्यांच्या पदाचा गैरफायदा घेण्यास किती लांब जातात यावर प्रकाश टाकतात.

  या व्यक्तींना अटक करण्यासाठी एसीबीची झटपट कारवाई प्रशंसनीय आहे आणि चंद्रपूरमध्ये भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही याची आठवण करून देणारी आहे.  जबाबदार व्यक्तींना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरून, ACB एक मजबूत संदेश पाठवते की भ्रष्टाचार मुक्त होणार नाही.

  या लाचखोरांची अटक हे अधिक पारदर्शक आणि जबाबदार समाजाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.  नागरिकांचा यंत्रणेवर विश्वास असणे आणि कोणत्याही भ्रष्ट पद्धती प्रक्रियेत अडथळा न आणता त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले जाईल यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे.

  चंद्रपूर ACB चा भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी केलेले प्रयत्न निष्पक्ष आणि न्याय्य समाजाची खात्री करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.  लाचखोरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचा सक्रियपणे पाठपुरावा करून आणि त्यांना पकडण्याद्वारे, ते भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहेत जिथे प्रत्येकाला वाढण्याची समान संधी आहे.

  नागरिकांनी त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरुक असणे आणि भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनांची तक्रार करणे महत्त्वाचे आहे.  एसीबीच्या कृतींमुळे आपण एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध लढू शकतो आणि चंद्रपूरचे चांगले भविष्य घडवू शकतो याची आठवण करून देतो.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभुळकर, रोशन चांदेकर, मेघा मोहूर्ले, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!