News34 chandrapur
चंद्रपूर – शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ चंद्रपूरकरांच्या भेटीला 2 फेब्रुवारी पासून आले आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत. Janta raja
2 फेब्रुवारीला जाणता राजा महानाट्य उदघाटन कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला, नागरिकांचा नाटकाला मिळालेला प्रतिसाद बघता पालकमंत्री मुनगंटीवार यांनी 5 फेब्रुवारीला सदर प्रयोग हा विना पास ने सर्व सामान्य नागरिकांना आयोजित करण्यात आल्याची घोषणा उदघाटन कार्यक्रमात केली. No pass required
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगला.
दररोज सायंकाळी 6 वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.