News34 chandrapur
चंद्रपूर :- भारत राष्ट्र समिती जिवतीच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहे. जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट जमिनीचे पट्टे देण्यात यावे व इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात यावी याकरिता भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आतापर्यंत महाराष्ट्र शासन व प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे भारत राष्ट्र समितीने आज महाराष्ट्र शासन व प्रशासनाचा निषेध करण्याकरिता तहसील कार्यालय जिवती येथे चप्पल व जोडे दाखवीत निषेध व्यक्त केला. bharat rashtra samiti
12 ऑक्टोबर 2023 रोजी जिवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने भुषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश मोर्चा काढला होता. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. Jivati taluka
महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली, मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्या अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते, इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. Farmer protests
तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार सुरू झालेले नाही. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे, शेत जमिनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प, युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, गावात पाण्यासाठी नळ, घरकुल, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक, न्यायालय, वसतिगृह, बीएसएनएलचे मोबाईल टावर, पटांगण, व्यायाम शाळा व वाचनालय सुरू करण्यात यावे. जिवती तालुक्यातील वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी, स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा उघडण्यात यावी अशा अनेक महत्त्वपूर्ण व रास्त मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पासून जिवती तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. Maharashtra government
आंदोलनाच्या चौथ्या दिवस लोटूनही शासन व प्रशासनाने दखल घेतली नसल्याने बीआरएस आंदोलनकर्त्यांच्या वतीने शासनाला चप्पल – जोडे दाखवीत निषेध नोंदवला. Agricultural sector
शासन व प्रशासनाने आंदोलनाची दखल घ्यावी आणि जिवती तालूका वासीयांना योग्य न्याय द्यावा असे आवाहन बि आर एस नेते भूषण फुसे यांनी केले आहे.