News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 23 फेब्रुवारीला चंद्रपूर मनपाच्या झोन क्रमांक 1 मधील कर लिपिक 52 वर्षीय फारुख अहमद मुस्ताक शेख यांना 15 हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. Anti corruption agency
फिर्यादी यांनी स्वतः व मुलांच्या नावाने फ्लॅट घेतले होते, त्या मालमत्तेवर भोगवटदार यांचे नावे समाविष्ट करण्यासाठी मनपा झोन क्रमांक 1 मध्ये अर्ज दिला होता. Bribery in government
मात्र कर लिपिक फारुख शेख यांनी फिर्यादीला काम करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली, फिर्यादी यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली. Transparency and accountability
23 फेब्रुवारीला तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत सापळा रचला, महानगरपालिका झोन क्रमांक 1 मध्ये 23 फेब्रुवारीला कर लिपिक फारुख शेख यांना 15 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. Bribe case
याबाबत सध्या पुढील तपास सुरू आहे, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे व पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, कार्यालयीन स्टाफ रमेश दुपारे, अरुण हटवार, नरेश ननावरे, राज नेवारे, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे व सतीश सिडाम यांनी केली. Corruption in municipality
फेब्रुवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग 3 कारवाया केल्या, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन करीत कोणतेही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम काम करून देण्यासाठी पैसे मागत असेल तर त्याबाबत चंद्रपूर कार्यालय क्रमांक 07172-250251 वर सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे