News34 chandrapur
चंद्रपूर – सध्या देशातली परिस्थिती अत्यंत भयावह असुन केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येत आहे. अनेक ED,CBI सारख्या स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन विरोधी पक्षांना कमकुवत करुन आपला राजकीय स्वार्थ साधत असल्याचे चित्र देशात निर्माण झाले आहे. Unity राज्यातील व केंद्रातील सरकार हे समाजा समाजात द्वेष निर्माण करुन लोकशाहीचा अपमान करीत आहे. त्यामुळे आज संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्रीत येणे गरजेचे असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बहुजन विचार मंच द्वारा आयोजित ‘लढा विचारांचा-सन्मान संविधानाचा’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. Constitution
बहुजन विचार मंच चंद्रपूर द्वारा आयोजित ‘लढा विचारांचा-सन्मान संविधानाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे पटांगणावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले लिखित तृतीयरत्न या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रतिभा धानोरकर उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या कि, आजची राजकीय परिस्थिती भयावह असून देश हुकुमशाही कडे वळत आहे. Democracy
आपल्याला आज संविधान रक्षणाची गरज असुन त्यासाठी बहुजन समाजाने एकत्रीत येणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाही बळकट होईल. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाने बहुजन समाजाचा वारसा जोपासला जाऊन कला व गीतांमधून प्रबोधन होणार आहे तसेच डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या माध्यमातून देशातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे मत देखील यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. Mla pratibha dhanorkar
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचे आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी चंद्रपूरातील विविध समाजातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आला. Political climate
उद्घाटन प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. सूर्यकांत खनके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अनिरुध्द वनकर यांच्यासह विनोद दत्तात्रय, रितेश तिवारी, नम्रता ठेमस्कर, चंदा वैरागडे, अनिल नरुले, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, बापू अन्सारी, सकिना अन्सारी, विना खनके, रमजान अली, अनुताई दहेगांवकर, शालिनी भगत, सचिन राजुरकर यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन श्री. गोपाल अमृतकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. प्रितिशा साधना, राहुल सुर्यवंशी, रामचंद्र कोंद्रा, स्वप्नील शेंडे, मोनु रामटेके, श्याम राजुरकर यांनी विशेष प्रयत्न केले.