News34 chandrapur
गुरू गुरनुले
मूल – मुल तालुक्यातील मुल पासून पाच की.मी. अंतरावर नागपूर मार्गावर एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या मरेगांव येथिल शेत शिवारात दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी बकऱ्या चारायला गेलेल्या १७ वर्षीय राजू दुधकोवर या तरुण युवकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मरेगांव येथे घडली. Leopard attack
सदर युवक रुग्णालयामध्ये उपचार करीत असतानाच दुसऱ्याच दिवशी आज दिनांक १८ फेब्रु २०२४ रोजी सकाळी पुन्हा मरेगाव येथील शेतकऱ्यांच्या तीन जनावरांवर हल्ला करून जखमी केल्याने मरेगाव गावात व परिसरात वाघाच्या भीतीने नागरिकही धास्तावले आहे. Wildlife animal
जखमी केलेले जनावरे श्री. विलास उध्दव उईके यांचा १ गोरा, श्री. मुरलीधर शंकर वाकुडकर यांचा १ वासरू, १ गाय, १ वगार अश्या चार जनावरांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून दररोज बिबट्याचा होत असलेला हल्ला मरेगाव नागरिकांना दहशत पसरविणारा असल्याने गावातील मानवावरही केव्हा हल्ला होईल हे सांगता येणार नाही. करीता गावात येऊन जनावरांना जखमी करणाऱ्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी मुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार यांनी केली आहे. Chandrapur districts
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दहशत पसरविणाऱ्या वाघाचा बंदोबस्त केल्या गेला नाही तर, सावली वनविभाग कार्यालयावर जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही संदीप कारमवार यांनी वनाधिकारी यांना दिला आहे.