Thursday, May 23, 2024
Homeगुन्हेगारीShiva Wazarkar Chandrapur : शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपीच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त

Shiva Wazarkar Chandrapur : शिवा वझरकर हत्याकांडातील आरोपीच्या कार्यालयातून शस्त्रसाठा जप्त

तलवार व एअर गन जप्त

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – आठवडाभरापूर्वी घडलेल्या शिवा वझरकर या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपातील आरोपी स्वप्नील काशिकरच्या कार्यालयातून शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. ही मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. या घटनेने चंद्रपूर महानगरात खळबळ उडाली आहे. Chandrapur news

 

25 जानेवारी ला चंद्रपुर शहरातील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील अरविंदनगर परिसरात ७-८ इसमांनी मिळून शिवा वझरकर या इसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. या घटनेने चंद्रपुर महानगरात एकच खळबळ माजली होती. सदर गुन्ह्याचे गांभिर्य पाहून या घटनेचा तपास गुन्ह्याचा पोलीस अधिक्षकानी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता वेगवेगळी पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आठ आरोपीतांना अटक केली. Shiva wazarkar chandrapur

 

 

अटकेतील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर विविध गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यात आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून यातील मुख्य आरोपी स्वप्नील काशिकर याचा रेतीचा तसेच ट्रांसपोटींगचा व्यवसाय आहे. यातील मृतक हा यापुर्वी स्वप्नील काशिकर याचे कडेच ठेकेदारीचे काम करायचा. पुढे चालून वर्चस्वाच्या तसेच पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून स्वप्नील काशिकार याचे ऑफीसचे समोरील मोकळ्या जागेतच शिवा वाझरकरची हत्या करण्यात आली.

 

पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान स्वप्नील काशिकर याचे ऑफीसची झडती घेतली असता त्याचे ऑफीसचे सोफ्यातून एक लोखंडी तलवार, एक एअर गन, ऑफीस टेबलचे खाली एक लोखंडी तलवार, एक स्टीलचे खंजीर असा मोठा शस्त्रसाठा मिळून आला. सदरचा शस्त्रसाठा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेण्यात आला. सदर शस्त्रसाठा कुठून आणला याबाबत आरोपीतांकडून सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

 

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि. जितेंद्र बोबडे, सपोनि. नागेशकुमार चतरकर, सपोनि. किशोर शेरकी, सपोनि. विकास गायकवाड, पोउपनि. विनोद भुरले, पोहवा. सुधिर मत्ते, पोशि. नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे, प्रमोद कोटनाके, चापोहवा. प्रमोद डंभारे, चापोशि. रूषभ बारसिंगे यांनी केली.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!