सहलीला घेऊन जातांना विद्यार्थ्यांनी भरलेला ट्रॅक्टर पलटी

News34 chandrapur

गुरू गुरनुले

मुल – मुल तालुक्यातील मौजा मोरवाही येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्या व विद्यार्थिनींची सहल सुवतीला नागपूर येथे नेण्याचे ठरविले होते. परंतु शिक्षकांचा आर्थिक बजेट कमी पडल्यामुळे शाळेचे विद्यार्थी नाराज होऊ नये म्हणुन मुख्याध्यापक श्री नैताम गुरुजी यांनी आपण विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या कन्हाळ गाव मारुती देवस्थान येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या खुशिसाठी ट्रॅक्टर मद्ये एकूण १५ मुले-मुली घेऊन गेले.

 

ट्रॅक्टरच्या मागे काही शिक्षक आपल्या स्वतःच्या गाडीने गेले. मधेच कन्हाळ गाव रस्त्यावर मुले – मुली घेऊन जाणारी ट्रॅक्टर पलटी झाल्याने अनेक मुले किरकोळ तर दोन मुली गंभीर जखमी झाल्याचे कळले.

 

घटना घडल्या लगेच सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालय मुल येथे उपचारासाठी तात्काळ नेण्यात आले. याबाबत मोरवाही येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री.नैताम यांना विचारले असता शाळेची सहलिबाबत केंद्र प्रमुख यांचेशी चर्चा करून सहमती घेतली असल्याचे सांगितले परंतु मुलांना ट्रॅक्टरनी नेणार आहोत व त्याची परवानगी घेतली नाही असे मत त्यांनी सांगितले.

 

जखमी विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. लाडे यांनी उपचार केल्याचे सांगितले. व एकूण विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी गंभीर असल्याने त्याच्या पालकांनी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेल्याचे सांगितले. परंतु अशी सहल नेतांना मुख्याध्यापकांनी पूर्व परवानगी घेण्याची गरज होती. अशा वेळेला शिक्षकांनी जबाबदारी झटकू नये असे पालकांचे मत होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!