Friday, June 14, 2024
Homeक्रीडाUnion Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प...

Union Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प – डॉ. अभिलाषा गावतुरे

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – केंद्र सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केला, आजचे अर्थसंकल्प निव्वळ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केले अशी प्रतिक्रिया डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

 

अतिश्रीमंत उद्योगपतींच्या गरीब देशात प्रस्तुत केलेलं २०२४ चे बजट व १० वर्षाच्या आर्थिक वाटचालीचे रिपोर्ट कार्ड म्हणजे समोरच्या निवडणुका लक्षात घेऊन सामाजिक न्याय, आर्थिक सहिष्णुता, महिला सन्मान, विकसित भारत सारख्या शब्दांची नुसती लखोरी अर्थमंत्री निर्मला सितारमन कडून वाहिली गेली.

 

दरवर्षी शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा, विद्यार्थी यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा बजट मुळातच कुठले ठोस योजना व त्यांची अंमलबजावणी करताना दिसत नाही. अर्थमंत्री आरोग्याच्या बाबतीत उपलब्ध मानवी संसाधन व पायाभूत सेवांना बळकट करण्यापेक्षा नवे फसवे स्वप्न दाखवीत आहेत. शेतकऱ्याला हमी भाव नाकारून सन्मान योजनेच्या नावाखाली भीक देणे म्हणजे बळीराजाचा अपमान आहे. Union finance minister nirmala sitaraman

 

शिक्षणाला बजेट नाकारुन,चांगल्या दर्जाचे प्राथमिक व उच्च शिक्षण नाकारून युवकाना स्किलइंडिया सारखे फसवे कार्यक्रम म्हणजे वेठबिगारी ला लावण्याचा प्रकार आहे. जर २५ टक्के लोक गरिबी रेषेच्या वर आले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले तर ८० कोटी लोकांना मोफत राशन ची देण्याची गरज का पडत आहे? या देशातील बहुसंख्य असलेला ओबीसी, एससी,एसटी यांचा देशातील उद्योग व देशातील साधन संपत्तीवर किती हिस्सा? महाज्योती, सारथी योजनेसाठी पुरेसा बजट नाही. Budget 2024

 

उच्चशिक्षणामध्ये महिलांचे प्रमाण वाढले पण व्यावसायिक शिक्षण घेऊन किती महिला सक्षम झाल्या याचे आकडे नाहीत! गेल्या ५ वर्षात प्रवेश मिळविलेले १३००० बहुजन विद्यार्थी IIT सारख्या संस्थांमधून बाहेर का फेकल्या गेले त्याचे उत्तर नाही! एकीकडे शाळा चालविणे व युवकाना पगार देणे परवडत नाही म्हणून शाळा बंद व नोकऱ्या कंत्राटी करणे , महांगाई वर न बोलणे , विकासाच्या नावावर फक्त भंपक बाजी करणे या सगळ्यागोष्टीला जनता कंटाळली आहे व हे बजट विकासाचे बजेट नसून फक्त इलेक्शन बजेट आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!