Boi ATM Chandrapur चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकपदी मुमक्का सुदर्शन रुजू झाल्यावर त्यांनी अवैध धंद्यावर कारवाईचा सपाटा लावला, जिल्हा क्राईम मुक्त रहावा यासाठी पोलीस अधीक्षकांच्या कारवाईचे सर्वांनी कौतुक करायला हवे.
हे ही वाचा – चंद्रपुरात लोकसभेचे 15 उमेदवार, अर्ज वैद्य
मात्र या काळात अनेक खूनाच्या घटना घडल्या, काही खून कौटुंबिक कलहातुन झाले मात्र काही बदला घेण्याच्या हेतूने झाले होते, कौटुंबिक कलह जेव्हा वाढतो त्यावेळी घरातील स्त्री ही पोलीस ठाण्यात जाऊन दाद मागण्यांचा प्रयत्न करते मात्र कौटुंबिक वाद आहे आपसात वाद मिटवा असा सल्ला पोलीस देतात मात्र इथेच ती चूक होऊन खुनाचे गुन्हे घडतात. Boi ATM Chandrapur
हे ही वाचा – सोशल मीडिया पोस्टवर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे लक्ष
पोलीस अधीक्षकांनी या बाबीकडे लक्ष द्यायला हवे, यांनंतर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध रेती, तंबाखू, मोहा दारू यावर मोहीम राबवित कारवाई केली, सुगंधित तंबाखूचा व्यापार आपल्याकडे अनेक वर्षांपासून सतत सुरू आहे, यामध्ये नेहमी लहान माशाला अटक केल्या जाते, मात्र मोठे मासे आजही हा धंदा लपून करीत आहे. त्यावर पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यायला हवे. Boi ATM Chandrapur
29 मार्चला मध्यरात्री शहरातील बंगाली कॅम्प चौकात बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला, बंगाली कॅम्प चौक हा वर्दळीच्या मार्गावर आहे, याठिकाणी कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहे, पण शहरात लावण्यात आलेले अनेक कॅमेरे मेंटनन्स अभावी बंद आहे. Boi ATM Chandrapur
काही दिवसांपूर्वी जटपूरा गेट व हॉस्पिटल वॉर्ड येथे मोबाईल स्नॅचिंग चा प्रकार पुढे आला, एक घटना रात्री 8 वाजता तर दुसरी घटना भर दिवसा सकाळी 11 वाजता घडली, याचा अर्थ गुन्हेगारी वृत्ती ला थांबविण्यात पोलीस विभागाला अपयश आले हे खरे. Boi ATM Chandrapur
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर 423 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली, दारू पिऊन वाहन चालविणे व बेदरकारपणे वाहन चालविणे यावर कारवाई पोलिसांनी केली, मात्र सदर मोहीम ही नेहमीसाठी वापरणे गरजेचे आहे, नियम तोडणाऱ्याच्या मनात पोलीस कायद्याचा धाक निर्माण करू शकतात मात्र तसे काही होताना दिसत नाही.
आजही सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान वरोरा नाका चौक ते जटपूरा गेट या मार्गावर रॅश ड्रायव्हिंग चे प्रकार घडतात यावर वाहतूक विभागाने लक्ष द्यायला हवे मात्र ते काम सुद्धा सध्या राम भरोसे आहे.