Chandrapur Loksabha Election Symbol : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप

Chandrapur Loksabha Election Symbol चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता 15 उमेदवार एकमेकांविरुद्ध लढाई लढणार आहे, 20 ते 27 मार्च या कालावधीत इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते, यावेळी एकूण 36 उमेदवारांनी 48 नामनिर्देशन अर्ज दाखल केले, 28 मार्चला झालेल्या छाननीत तब्बल 21 उमेदवारांचे 33 नामनिर्देशन अर्ज बाद झाले, व 15 उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरविण्यात आले. Chandrapur Loksabha Election Symbol

 

30 मार्च अर्ज मागे घेण्याची तारीख होती पण कुणीही अर्ज मागे न घेतल्याने आता एकूण 15 उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे आहे.

याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली. Chandrapur Loksabha Election Symbol

हे ही अवश्य वाचा – वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने भाजपवर केला हल्ला

गौडा म्हणाले की अर्ज छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, बसपा चे राजेंद्र रामटेके, जनसेवा गोंडवाना पार्टी अवचित सयाम, जय विदर्भ पार्टी अशोक राठोड, गोंडवाना गणतंत्र पार्टी नामदेव शेडमाके, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पूर्णिमा घोनमोडे, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले, अखिल भारतीय मानवता पक्ष वनिता राऊत, सन्मान राजकीय पक्ष विकास लसंते, भीम सेना विद्यासागर कासरलावार, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सेवकदास बरके, अपक्ष दिवाकर उराडे, मिलिंद दहिवले, संजय गावंडे यांचा समावेश आहे. Chandrapur Loksabha Election Symbol

 

सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे. लोकसभा क्षेत्रातील एकूण 18 लाख 37 हजार 906 मतदार 19 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावतील. Chandrapur Loksabha Election Symbol

कुणाला मिळाले कोणते निवडणूक चिन्ह?

प्रतिभा धानोरकर – पंजा, सुधीर मुनगंटीवार – कमळ, राजेंद्र रामटेके – हत्ती, अवचित सयाम – टीव्ही, अशोक राठोड – गॅस सिलेंडर, नामदेव शेडमाके – Saw(आरी), पूर्णिमा घोनमोडे – सिटी, राजेश बेले – रोड रोलर, वनिता राऊत – पेन निब (with seven rays), विकास लसंते – रिंग, विद्यासागर कासरलावर – ऑटो रिक्षा, सेवकदास बरके – बास्केट (containing fruits), दिवाकर उराडे – कोट, मिलिंद दहिवले – बॅट, संजय गावंडे – टायर

आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!