Farmers problem in Chandrapur : सुधीरभाऊ महोत्सव झाले असेल तर इकडे ही लक्ष द्या – सुर्या अडबाले

Farmers problem in Chandrapur चंद्रपूर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटा नागपूर व विचोडा गावात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे, यावर वनविभाग व औष्णिक वीज केंद्राने तात्काळ पाऊले उचलावी अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केली आहे.

 

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राला लागून असलेल्या छोटा नागपूर व विचोडा गावातील शेतकऱ्यांच्या दुधाळू गायीची शिकार होत आहे, आतापर्यंत कमीतकमी 45 गायीची शिकार वाघाने केली, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. Farmers problem in Chandrapur

 

गावालगत असलेल्या झुडपातून वाघ येत असल्याचे निदर्शनास आले आहे, झुडपे साफ करण्यासाठी वीज केंद्राने निविदा सुद्धा काढली मात्र काम काही सुरू झाले नाही.

वाचा – चंद्रपुरात 41 पोलिसांना जेवणातून विषबाधा

वनमंत्री मुनगंटीवार व औष्णिक वीज केंद्राने यावर लक्ष देत शेतकऱ्यांची समस्या सोडवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केली आहे. जर शेतकऱ्यांची समस्या निकाली न काढल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा अडबाले यांनी यावेळी दिला. Farmers problem in Chandrapur

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!