Marathi Patrakar Sangh Chandrapur चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची आम सभा जिल्हा मराठी पत्रकार संघ भवन, चंद्रपूर येथे मंगळवार दि.12 मार्च 2024 रोजी अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभे मध्ये वर्ष 2024 ते 2027 पर्यंतची नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी बंडूभाऊ लडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बबनराव बांगडे यांनी कार्य केले.
मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम यांनी अध्यक्ष पदासाठी बंडू लडके यांचे नाव सूचित केले. यावर सर्वांनी एकमताने सम्मती दिली. एक आठवड्यात नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल असे नवनिर्वाचित अध्यक्षांनी यावेळी जाहिर केले. Marathi Patrakar Sangh Chandrapur
वाचा – कोट्यवधीचे उत्सव, पण हे काम निधी अभावी रखडले, चंद्रपुरात धक्कादायक प्रकार
याप्रसंगी परिषद प्रतिनिधि मुरलीमनोहर व्यास, सरचिटणीस सुनील तिवारी, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, वैभव पलिकुंडवार, कोषाध्यक्ष मोरश्वर राखूंडे, दीपक देशपांडे,रवी नागपुरे, अनिल बाळसराफ, नामदेव वासेकर,षडाकांत कवठे,राजेश बारसागडे, सुरेश डांगे,अंबिकाप्रसाद दवे,मंगल जीवने,सूरज बोम्मावार, उदय गडकरी यासह मूल, सावली, राजूरा, बल्लारपूर, पोंभुर्णा,चिमूर, नागभीड आदि विविध तालुका पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.