12th hsc result 2024 आज संपुर्ण राज्यात 12 वी चे निकाल जाहीर झाला असून सर्वच विद्यार्थी निकाल पाहून यश प्राप्त केल्यानंतर आनंद साजरा करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे आज मंगळवारी दुःखद दुर्दैवी घटना समोर आली आहे.
अवश्य वाचा : चंद्रपुरात जाहिरातीचे 40 अनधिकृत फलक
एका विद्यार्थ्यांने बारावीत नापास झाल्याने नैराश्यात येऊन त्याने घरीच गळफास घेवून जीवनयात्रा संपविली आहे. आकाश पुरुषोत्तम वैरागडे (वय 18) रा. नेरी (चिमूर) असे मृतकाचे नाव आहे. नेरी गावात शोककळा पसरली आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार नियमबाह्य
12th hsc result 2024 चिमूर तालुक्यातील नेरी येथील आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विद्यार्थी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. बारावीची परीक्षा झाली आणि पेपरसुद्धा चांगले गेले असल्याने परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन करिन असा त्याचा आत्मविश्वास होता. आज मंगळवारी मात्र निकाल लागताच ऑनलाइन निकाल पाहताच त्याला धक्का बसला.
महत्वाची बातमी : घरबसल्या काढा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
अभ्यास व मेहनत करूनही त्याला इंग्रजी व इतिहास या विषयात कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला त्यामुळे तो नैराश्यात गेला. त्याने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेत घरात कुणीही नसतांना दरवाजा बंद करून दोराने दुपारी 2 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी उघडकीस आली.
12th hsc result 2024 सदर घटनेची माहिती बाहेरून सायंकाळी 6 वाजता दरम्यान घरी परत आलेल्या भावाला माहित झाली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याने आवाज देऊनही आतून प्रतिसाद न आल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी भावाला धक्का बसला. मृत्तदेह घराला लटकलेल्या अवस्थेत आधळून आला. शेतात कामाला गेलेले आई वडील घरी पोहचले. त्यांनाही धक्का बसला. मृत्यूची वार्ता गावात पसरताच आकाशला बघण्यासाठी घरासमोर गर्दी झाली.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तपास सूरू केला आहे. परंतू आकाशने आज घोषीत झालेल्या बारावीच्या परीक्षेत दोन विषयात नापास झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे कारण समोर येत आहे. नेरी गावावर शोककळा पसरली.