चंद्रपूर : Chandrapur BJP Honor अंतर्गत चंद्रपूर महानगर भारतीय जनता पक्षाने राज्यात अव्वल स्थान मिळवत मोठे यश प्राप्त केले आहे. मुंबई येथे झालेल्या प्रदेश आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी चंद्रपूर महानगरच्या उत्कृष्ट संघटनात्मक कामगिरीचा विशेष गौरव केला. बूथस्तरापासून ते जिल्हा पातळीपर्यंत प्रभावी कार्य, प्रशिक्षण शिबिरे आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामुळे हे यश मिळाले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला असून संपूर्ण संघटनेत आनंदाचे वातावरण आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनेच्या वतीने मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत संघटनात्मक कामगिरीबाबत चंद्रपूर महानगर राज्यात अव्वल ठरल्याचे गौरवोद्गार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या जाहीर भाषणात काढले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भाजप महानगर पदाधिकाऱ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (चंद्रपूर-गडचिरोली प्रदूषणावर युवासेना उचलणार आवाज)
गुरुवारी चंद्रपूर महानगर कार्यालयात आयोजित एसआयआर अभियानाअंतर्गत बीएलओ बैठकीदरम्यान हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, रघुवीर अहिर, महामंत्री रविंद्र गुरनुले, नामदेव डाहुले, श्याम कनकम, सविता दंढारे, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.
Chandrapur BJP Honor अंतर्गत मोठा राज्यस्तरीय गौरव
नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत जिल्हा व मंडळ बैठका, एसआयआर अभियान, प्रशिक्षण शिबिरे, बूथस्तरीय कार्य, ‘मन की बात’ कार्यक्रम, संघटन विस्तार तसेच कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क अशा विविध निकषांच्या आधारे कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांच्या समर्पित योगदानाच्या बळावर भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर महानगरने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
या अभिमानास्पद यशाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रपूर महानगर कार्यालयात आयोजित एसआयआर अभियानाअंतर्गत बीएलओ बैठकीदरम्यान हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “चंद्रपूर महानगर भाजपची राज्यातील अव्वल कामगिरी ही प्रत्येक पदाधिकारी, बूथ कार्यकर्ता आणि संघटनेशी निष्ठा ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फळ आहे. पक्ष संघटनेने दिलेल्या प्रत्येक कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी, नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि तळागाळापर्यंत पोहोचलेले संघटन यामुळेच हा मान मिळाला आहे. आगामी काळातही याच जोमाने कार्य करून चंद्रपूर महानगरला संघटनात्मकदृष्ट्या आणखी बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
बैठकीत एसआयआर अभियानाच्या अनुषंगाने बूथस्तरावरील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी कार्यक्रमांचे नियोजन, मतदार संपर्क अभियान आणि संघटन विस्ताराबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भाजप महानगरातील पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, बूथ प्रमुख, बीएलओ तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now