चंद्रपूर : (Babupeth Waterlogging) चंद्रपूर च्या बाबूपेठ येथील वार्ड क्रमांक १७ मध्ये मुसळधार पावसानंतर गंभीर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. (चंद्रपूर मनपात नगरसेवक आपसात भिडले)
बाबूपेठ येथील वार्ड क्र. 17 मधील हनुमान मंदिर परिसरात पावसामुळे गंभीर पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
Babupeth Waterlogging बाबूपेठेत पावसानंतर घरांमध्ये पाणी कसे शिरले?
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात अनेक वर्षांपासून पावसाळ्यात जंगलातून वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना प्रत्येक वर्षी मोठा त्रास सहन करावा लागतो. वार्डात अद्यापही रस्ता आणि नाल्यांची कामे पूर्ण झालेली नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
काही दिवसांपूर्वी नगरसेवकांनी परिसरात भराव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही नागरिकांनी ट्रॅक्टरच्या ये-जा संदर्भात आक्षेप घेतल्याने ते कामही पूर्ण होऊ शकले नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
याशिवाय, परिसरातील 10 ते 15 फूट रुंदीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून काही ठिकाणी बांधकाम करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जात असून पाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या समस्येची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी, रस्ते व नाल्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत तसेच अतिक्रमणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






