Warora Crime News Nehru Chowk mobile shop knife attack

कॉलर पकडून बाहेर ओढले अन् थेट पोटावर चालवला चाकू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 6, 2026

वरोरा – वरोरा शहरातील गजबजलेल्या नेहरू चौक परिसरात एक धक्कादायक (Warora Crime News) घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी एका मोबाईल शॉपीमध्ये घुसून दोन युवकांनी दुकानदारावर आणि त्याच्या चुलत भावावर जीवघेणा चाकू हल्ला केला. या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, वरोरा पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे. (हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला रामनगर पोलिसांनी केली अटक)

वरोरा शहरातील नेहरू चौक परिसरात रविवारी सायंकाळी मोबाईल शॉपीमध्ये घुसून दोन युवकांनी दुकानदारावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दुकानदारासह त्याच्या चुलत भावालाही दुखापत झाली असून वरोरा पोलिसांनी दोघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Warora Crime News : जुन्या वादाचा भयानक सूड

फिर्यादी मोहन मुरलीधर दाते (रा. करंजी, ता. वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते नेहरू चौक येथे मोबाईल शॉपी चालवतात. त्यांच्या लहान भावाचे दोन वर्षांपूर्वी सुरज गोहणे याच्याशी भांडण झाले होते. त्या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे सुरज गोहणे हा त्यांच्यावर राग धरून होता.

रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मोहन दाते हे त्यांच्या मोबाईल शॉपीमध्ये असताना सुरज गोहणे तेथे आला. त्याने शिवीगाळ करत त्यांची कॉलर पकडून दुकानाबाहेर ओढले व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा साथीदार सादिक शेख हा हातात चाकू घेऊन घटनास्थळी आला. सुरुवातीला त्याने मोहन दाते यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरज गोहणे याने सादिकच्या हातातील चाकू घेत मोहन दाते यांच्या पोटावर वार केला. हा वार चुकविण्याचा प्रयत्न केला असता चाकू बरगडीजवळ लागला. त्यानंतर त्याने मानेवरही वार करण्याचा प्रयत्न केला.

या वेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या चुलत भाऊ प्रतीम दाते यांच्यावरही सुरज गोहणे याने चाकूने पाठीवर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी दोघेही ‘आज तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत चाकू फिरवत होते. दरम्यान, परिसरातील प्रशांत राजूरकर व कैलास चिकणकर हे धावून आल्याने दोन्ही आरोपी चाकूसह घटनास्थळावरून पळून गेले.

या प्रकरणी मोहन दाते यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी आरोपी सुरज गोहणे (रा. कळमगव्हाण) व सादिक शेख (रा. वरोरा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे करीत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment