चिमूर – चिमूर शहरातील क्रांतीनगर परिसरात Chimur Car Accident Airbag मुळे एका चालकाचे प्राण वाचल्याची थरारक घटना समोर आली आहे. चिमूर–वरोरा राज्य मार्गावर दोन ट्रकांच्या कचाट्यात सापडल्याने एका कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील आणि मागील भाग पूर्णपणे दाबला गेला. मात्र, धडकेच्या वेळी कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे चालकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. (चंद्रपूर जिल्हा गणेशोत्सवात डीजे बंद)
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील लोणकर पेट्रोल पंपासमोरील क्रांतीनगर परिसरात चिमूर–वरोरा राज्य मार्गावर शुक्रवारी भीषण अपघात घडला. दोन ट्रकांच्या कचाट्यात सापडलेल्या कारचा पुढील आणि मागील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने चालकाचा जीव थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली.
Chimur Car Accident Airbag ठरली चालकासाठी खरी देवदूत
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-३४-बीझेड-०८३४ क्रमांकाचा ट्रक चिमूर-वरोरा मार्गाने जात असताना त्याला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या धडकेमुळे कारचा समोरील भाग गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाला. अपघातानंतर कार सावरत असतानाच मागून येणाऱ्या एका ओव्हरलोड ट्रकनेही कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे कारचा मागील भागही पूर्णपणे चक्काचूर झाला आणि कार दोन ट्रकांच्या मध्ये अडकून पडली.
या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी चालकासाठी एअरबॅग देवदूत ठरली. धडकेच्या क्षणी एअरबॅग उघडल्याने चालकाला गंभीर दुखापत होण्यापासून बचाव झाला. तसेच दोन्ही ट्रकचा वेग तुलनेने कमी असल्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस शिपाई फाल्गुन परचाके आणि गणेश वाघ यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी जमलेली गर्दी नियंत्रणात आणली तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. पोलिसांनी दोन्ही ट्रक आणि अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातामुळे काही काळ चिमूर–वरोरा राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे वाहतूक लवकरच पूर्ववत करण्यात आली. या घटनेनंतर वाहनचालकांनी ओव्हरटेक करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






