avaidh reti vahatuk । शासन मालकीच्या नदीपात्रात वाळू तस्करी, भिसी पोलिसांनी केली कारवाई

avaidh reti vahatuk : भिसी (चिमूर) – चंद्रपूर जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरु आहे, पोलिसांच्या हाती अद्याप या सिंडिकेट मधील मोठे मासे हाती लागले नाही, या मोहिमेदरम्यान भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत पोलिसांनी १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

१६ चाकी ट्रकमधून १० ब्रास रेती जप्त avaidh reti vahatuk

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध रेती घाटावर रॉयल्टी नसताना सुद्धा छुप्या पद्धतीने अवैध उत्खनन सुरु आहे, २७ मे रोजी भिसी पोलीस पेट्रोलिंग करीत होती, त्यावेळी शंकरपूर येथे कानपा ते चिमूर मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ १६ चाकी ट्र्क क्रमांक MH ४० BL ७७०२ हा संशयास्पद स्थितीमध्ये उभा असल्याने पोलिसांनी चौकशी केली. (गुन्हे शाखेने केली वाळू माफियांवर कारवाई, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त)

१६ चाकी ट्र्क ची झडती घेतली असता त्यामध्ये शासकीय मालकीच्या नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन केलेली १० ब्रास पांढरी रेती आढळून आली. चालकाला नाव विचारले असता त्याने ३२ वर्षीय मोहसीन शेख सिराजुद्दीन राहणार अमरावती असे सांगितले. पोलिसांनी यावेळी रेती सह एकूण १९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची यश्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनि रविंद्र वाघ, सतीश झिलपे व वैभव गोहणे यांनी केली.

Leave a Comment