चंद्रपूर बसस्थानक स्वच्छता प्रश्नावर आगार व्यवस्थापकांना निवेदन देताना युवासेना पदाधिकारी

१४ कोटीच्या बस स्थानकाची दयनीय अवस्था, युवासेनेचे निवेदन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 9, 2026

चंद्रपूर :- चंद्रपूर बसस्थानक स्वच्छता प्रश्नावर युवासेनेने आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, शौचालयांत दुर्गंधी असून नियमित स्वच्छता होत नाही. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. ८ दिवसांत उपाययोजना न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चंद्रपूर बसस्थानक स्वच्छता: १४ कोटीचे बस स्थानक अस्वच्छ

चंद्रपूर शहरात तब्बल १४ कोटी रुपये खर्चून अवाढव्य बस स्थानकाचे निर्माण करण्यात आले, मात्र बस स्थानकावरील अवस्था अत्यंत दयनीय स्वरूपाची झाली आहे, बस स्थानकामधील शौचालय सध्या घाण व दुर्गंधीचे केंद्र बनले आहे. सध्या शौचालय देखभालीचे कंत्राट स्मार्ट सर्व्हिसेस ला मिळाले असून देखील स्वच्छता होत नाही आहे, यामुळे प्रवाशाला दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे या बस स्थानकावर तिकिटात २ रुपये हे स्वच्छतेचे कापण्यात येते अशी माहिती आहे, त्यानंतरही अशी अवस्था आहे. यावर चंद्रपूर उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी ९ नोव्हेंबर रोजी याबाबत आगार व्यवस्थापकांना जाब विचारत. ८ दिवसांच्या आत यावर तोडगा काढा अन्यथा बस स्थानकात ठिय्या आंदोलन करणार असा इशारा दिला. (फटाके फोडण्यावरून वाद, कुटुंबाला मारहाण, वाचा बातमी)

चंद्रपूर बसस्थानक स्वच्छता: दयनीय अवस्था

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून, सद्यस्थितीत बसस्थानकातील स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. बसस्थानक परिसरात पसरलेली दुर्गंधी, नियमित स्वच्छतेचा अभाव आणि महिलांच्या स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅडसारख्या आवश्यक सुविधांचा असलेला अनुलेखन यामुळे महिला प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापकांना सविस्तर निवेदन देऊन तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपूर बसस्थानक स्वच्छता: युवासेनेच्या निवेदनात काय?

शिवसेना युवासेनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चंद्रपूर बसस्थानक हे दररोज हजारो प्रवाशांच्या येण्या-जाण्याचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, पूर्वी स्थानिक स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत बसस्थानकाची स्वच्छता समाधानकारक पद्धतीने राखली जात असताना, आता हे स्वच्छता व देखभालीचे काम खाजगी कंपनीकडे सोपविल्यापासून स्वच्छतेच्या दर्जामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. खाजगी ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे बसस्थानक परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, संबंधित कंत्राटदाराच्या कामाची कसून चौकशी करून योग्य ती दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

युवासेनेच्या प्रमुख मागण्या, चंद्रपूर बसस्थानक स्वच्छता

प्रवाशांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नावर युवासेनेच्या वतीने काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये संपूर्ण बसस्थानक परिसराची तातडीने सखोल स्वच्छता करण्यात यावी, सर्व स्वच्छतागृहांची दिवसातून अनेक वेळा नियमित स्वच्छता राखण्यात यावी, महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅडची सोय करून योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच स्वच्छतागृहांमध्ये पाणी, साबन व स्वच्छतेच्या इतर मूलभूत सुविधा तात्काळ बहाल कराव्यात, अशा मागण्यांचा समावेश आहे. जर ८ दिवसात प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना केली नाही, तर युवासेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी युवासेना शहर प्रमुख सय्यद फरदीन, शाहरुख शेख, चेतन जिराफे, मुस्तकीम शेख व साहिल खान उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment