कोरपणा पोलीस पाटील गुन्हा प्रकरणाची नोंद झालेले गडचांदुर पोलीस ठाणे

ढोलकी वरून वाद, पोलीस पाटलासह दोघांवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 23, 2026

कोरपणा: कोरपणा पोलीस पाटील गुन्हा प्रकरणी गडचांदुर पोलिसांनी कारवाई गावातील दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. भजनाची ढोलकी परत मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादात ही घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिला सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करण्यात आली. मध्यस्थीसाठी आलेल्या मुलालाही ढकलून देण्यात आले. पोलीस पाटील संदीप रमेश पाचभाई आणि आकाश ज्ञानेश्वर वडस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (कोंबड्याच्या झुंजीवर जुगार, पोलिसांची छापेमारी, वाचा सविस्तर)

कोरपणा पोलीस पाटील गुन्हा: कोणावर काय आरोप?

कोरपणा तालुक्यातील कारवाई (सांगोळा) गावात भजनासाठी वापरली जाणारी ढोलकी परत मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादात महिलेला सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करत मध्यस्थी करणाऱ्या मुलाला ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. गडचांदुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारावरून पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई येथील रहिवासी असलेल्या महिलेच्या पतीने गावातील भजनाच्या कार्यक्रमासाठी एक ढोलक खरेदी केली होती. या ढोलकीचा वापर गावातील इतर नागरिकही करत होते. गेल्या सुमारे एक महिन्यापासून ही ढोलकी गावातील राजेंद्र मोहीतकर यांच्याकडे होती. ती परत मागण्यासाठी फिर्यादी व इतर महिला तसेच मुलासह राजेंद्र मोहीतकर यांच्या घरी गेल्या होत्या.

ढोलकी परत मागण्यावरून वाद, कोरपणा पोलीस पाटील गुन्हा

राजेंद्र मोहीतकर यांना आवाज दिल्यानंतर ते घराबाहेर आले. महिलेने त्यांच्याकडे असलेली ढोलकी एक महिन्यापासून असल्याचे सांगून परत देण्याची विनंती केली. त्यावर मोहीतकर यांनी ढोलकी देतो, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा असे सांगितल्याने सर्वजण घरासमोरील रस्त्यावर थांबले होते. याच दरम्यान गावातील पोलीस पाटील संदीप रमेश पाचभाई आणि आकाश ज्ञानेश्वर वडस्कर तिथे आले. राजेंद्र मोहीतकर यांच्या घरी का गेलीस, असा जाब विचारत दोघांनी महिलेला सोबतच्या महिलांसमोर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार पाहून सोडवण्यासाठी आणि समजावण्यासाठी पुढे आलेल्या मुलालाही शिवीगाळ करत ढकलून देण्यात आले.

या घटनेनंतर महिला आपल्या पतीसह गडचांदुर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या माहितीच्या आधारे, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री पोलीस पाटील संदीप रमेश पाचभाई आणि आकाश ज्ञानेश्वर वडस्कर (दोघेही रा. कारवाई, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२) (स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे), २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य किंवा शिवीगाळ) आणि ३(५) (समान उद्देशाने केलेले कृत्य) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विजयकुमार लक्ष्मण मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment