Mining Royalty : खनिज विकास निधी तात्काळ दिला नाहीतर, वरोरा – भद्रावतीतील वाहतूक बंद करू – आमदार धानोरकर

Mining Royalty : खनिज विकास निधी तात्काळ दिला नाहीतर, वरोरा – भद्रावतीतील वाहतूक बंद करू – आमदार धानोरकर

Mining Royalty जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. परंतु जिल्ह्याच्या विकासाकरिता वरदान असलेल्या तरी शेतकरी बांधवांकरिता ह्या खाणी शाप ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वेकोलिकडे प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे वेकोलि कुठेही ओव्हर बर्डनची साठवणूक करीत असतात.

अवश्य वाचा : चंद्रपुरात भूस्खलन

या ओव्हर बर्डनमुळे नदी नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात देखील बदल झाला आहे. हा देखील गंभीर विषय असून नदी नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे जास्त पाऊस आल्याने शेतीतील पिके देखील वाहून जातात. त्यामुळे लाखो रुपयांचे पीक शेतकऱ्यांचे वाहून जातात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे ओव्हर बर्डन मुळे पिके वाहून गेलेली आहेत. अश्या शेतकऱ्यांना तात्काळ वेकोलिकडून १ लाख रुपये निधीची मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार धानोरकर यांनी केली आहे.

IMG 20230731 WA0011

खनिज विकास निधी तात्काळ दिला नाहीतर, वरोरा – भद्रावतीतील वाहतूक बंद करू : आमदार प्रतिभाताई धानोरकर

mining royalty चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख व गौण खनिजांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. हा निधी खनिजांमुळे प्रत्यक्ष बाधित व इतर बाधित क्षेत्रांतील विकास कामांवर नियमीत खर्च झाला पाहिजे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानद्वारे खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत 2019-20 मध्ये 444 कामांवर 112.97 करोड, 2020-21 मध्ये 1242 कामांवर 171.85 करोड तर 2021-22 मध्ये 294 कामांवर 61.53 करोड रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्यानंतर 2022-23 व चालू वर्षी म्हणजेच 2023-24 मध्ये प्रत्यक्ष बाधीत व इतर बाधित क्षेत्रात खनिज विकास निधीतून एकाही विकास कामाला प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली नाही. खनिज विकास निधी अंतर्गत सद्यास्थितीत 1080 करोड रुपयांचे प्रस्ताव मंजूरीसाठी धूळ खात पडून आहेत तर सुमारे 550 करोडचा निधी जमा आहे. हा निधी खनिज विकास निधीच्या दिशानिर्देशाप्रमाणे त्वरीत खर्च झाला पाहिजे. विविध खनिजांच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरीक मोठ्याा प्रमाणात बाधीत होत असतात, अशा स्थितीत हा निधी विनाकारण अडवून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा अन्याय असून खनिज विकास निधी तात्काळ दिला नाहीतर, वरोरा – भद्रावतीतील वाहतूक बंद करू असा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिला. तात्काळ या निधीचे विकास कामाकरिता वितरण होणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!