Ballarpur Pistol Seizure प्रकरणात देशी पिस्टल जप्त

बल्लारपूरमध्ये अवैध Pistol Seizure सह तरुण अटकेत; LCBची धडक कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 5, 2026

बल्लारपूर: Ballarpur Pistol Seizure चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये सध्या जिल्ह्यात गुन्हेगार आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात गुन्हेगारी वृत्तीच्या मुसक्या आवळण्याची धडक मोहीम सुरू असून, या मोहिमेला मोठे यश आले आहे. गेल्या दोन दिवसांत गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल २ भरमार बंदुका आणि एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त करून गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहेत. याच मोहिमेअंतर्गत दि. ०४ जून २०२६ रोजी बल्लारपूर येथे अवैधरित्या, विनापरवाना घातक शस्त्र बाळगणाऱ्या एका तरूणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभाग राजुरा पथकाने यशस्वी छापा टाकला. (२ भरमार बंदुका जप्त, गुन्हे शाखेची कारवाई)

Ballarpur Pistol Seizure आरोपी अटकेत

या कारवाईत पोलिसांनी सलमान खान मजिद खान पठाण (वय २८ वर्षे, रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड, बल्लारशा, ता. बल्लारशा, जि. चंद्रपूर) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी आपल्याजवळ बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती, ज्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या छाप्यात पोलिसांनी आरोपीकडून ३९,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत राऊंड जप्त केले आहेत.

या गंभीर प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारशा येथे अपराध क्रमांक ६५१/२६, कलम ३, २५ भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात उपविभाग राजुरा पथकाने ही धडक कामगिरी बजावली असून, पोलीस आता हे शस्त्र आरोपीने कुठून आणले आणि त्याचा काय बेत होता, याचा सखोल तपास करत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment