Chandrapur Forex Fraud EOW Police Investigation News34

१० टक्के नफ्याच्या नादात कोट्यवधी बुडाले; चंद्रपुरात नेमकं काय घडलं? पोलिसांनी गुंतवणूकदारांना केले महत्वाचे आवाहन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 8, 2026

चंद्रपूर : Chandrapur Forex Fraud प्रकरणात ५१ गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक उघडकीस आली आहे. वरोरा परिसरातील नागरिकांना दरमहा १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून आरोपीने गंडा घातला. या महाघोटाळ्याचा तपास चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात डीजे विरोधात कडक नियम, नियम मोडल्यास थेट अटकेची कारवाई)

ज्या गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी पुरावे घेऊन तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. फसवणूक झालेल्या नागरिकांची तक्रार नोंदवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.

Chandrapur Forex Fraud : नेमके काय आहे १.५९ कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण?

फॉरेक्स ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास 10 टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून 51 गुंतवणूकदारांची एकूण 1 कोटी 59 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूरमार्फत तपास सुरू आहे. या प्रकरणात ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम अद्याप परत मिळालेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फिर्यादी शरद वाल्मीकराव मांदाळे, रा. महाकाली नगरी, माढेळी रोड, वरोरा यांच्या तक्रारीवरून आरोपी राजुभाई दयाभाई देसाई, रा. किसनगंज पार्क, तिथल रोड, वलसाड, गुजरात यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन वरोरा येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 318(4), महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act), 1999 चे कलम 3 तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम, 2019 च्या कलम 21, 22 व 23 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर प्रकरणात फॉरेक्स ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास 10 टक्के दराने परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर 51 गुंतवणूकदारांकडून रोख तसेच आरटीजीएसद्वारे एकूण 1 कोटी 59 लाख 50 हजार रुपये स्वीकारून गुंतवणूक केलेली रक्कम तसेच सांगितल्याप्रमाणे परतावा न देता फसवणूक केल्याची तक्रार आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे. तपासाच्या अनुषंगाने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची नावे व त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेच्या याद्या तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.

आवश्यक कागदपत्रे : ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम अद्याप परत मिळालेली नाही, त्यांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच ज्या खात्यावर रक्कम प्राप्त करावयाची आहे त्या राष्ट्रीयीकृत बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत व गुंतवणुकीसंदर्भातील अन्य उपलब्ध कागदपत्रे सोबत आणावीत.

तसेच परिशिष्ट-1 मधील विहित नमुन्यातील अर्ज भरून सादर करण्यासाठी संबंधित गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, (पोलिस ठाणे दुर्गापूर परिसर), पोलिस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अभिषेक बागडे यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment