Chandrapur Ganja Smuggling News LCB police seized contraband and arrested accused

ओडिशातून चंद्रपुरात आला १७ किलो गांजा, वाटेत LCB ने वाट लावली

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 3, 2026

चंद्रपूर : Chandrapur Ganja Smuggling News चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. ओडिशातून महाराष्ट्रात चारचाकी वाहनाने आणला जाणारा १७.४७५ किलोग्रॅम गांजा पोलिसांनी बामणी चौकात जप्त केला. (हे हि वाचा – कोर्ट केस परत न घेतल्याने सासुरवाडीत जावयाने फिरवला चाकू, ३ जखमी)

या धडक कारवाईत पोलिसांनी तीन आंतरराज्यीय तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. वाहनासह चार मोबाईल असा एकूण १७ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बल्लारशा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrapur Ganja Smuggling News : आंतरराज्यीय तस्करीचा मोठा पर्दाफाश

ओडिशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अमली पदार्थांच्या आंतरराज्यीय तस्करीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. बल्लारपूर-राजुरा मार्गावर बामणी चौकात सापळा रचून पोलिसांनी १७ किलोहून अधिक गांजा, चारचाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण १७ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आंतरराज्यीय तस्करासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

१७.४७५ किलो गांजा आणि मोबाईलसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाला २ सप्टेंबर २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, काही व्यक्ती ओडिशा राज्यातून चारचाकी वाहनाने मोठ्या प्रमाणावर गांजा घेऊन येत असून तो विक्रीसाठी नेला जाणार आहे. या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तात्काळ हालचाली करत बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी चौक येथे नाकाबंदी करून सापळा रचला. काही वेळातच संशयित चारचाकी वाहन (क्रमांक एमएच-२४ बीआर-९२८२) येताना दिसताच पोलिसांनी ते अडवले. वाहनाची कसून झडती घेतली असता, त्यामध्ये १७.४७५ किलोग्रॅम गांजाची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी वाहनातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन चारचाकी वाहन, १७.४७५ किलो गांजासदृश वनस्पती आणि वापरते ४ मोबाईल फोन असा एकूण १७ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत पोलिसांनी अमोल रमेश कांबळे (वय ३३ वर्षे, रा. एरंडी सरोडा, ता. औसा, जि. लातूर), सदानंद रवींद्र जना (वय ३२ वर्षे, रा. साबोरिया, ता. खलीगोट, जि. गंजाम, राज्य ओडिशा) आणि ओंगा बिरा कोवासी (वय २८ वर्षे, रा. बोपनपल्ली, ता. कालीमेला, जि. मलकनगिरी, राज्य ओडिशा) या तिघांना अटक केली आहे. पकडण्यात आलेले सर्व आरोपी मजुरीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले असून, त्यांच्याविरुद्ध बल्लारशा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act, 1985) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारशा पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

सदरची यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत सपोनि दीपक कांकेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, गणेश भोयर, रामराव बिंगेवाड, शरद कुडे, रजनीकांत पुठ्ठावार, सचिन गुरनुले, सुभाष गोहोकार तसेच पोलीस अंमलदार प्रतीक हेमके, विठ्ठल काकडे, प्रफुल पुप्पलवार आणि पोलीस शिपाई दिनेश अराडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे अवैध अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment