गडचांदूर: गडचांदूर गांजा जप्त प्रकरणात पोलिसांनी एका इसमाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (२७ ऑक्टोबर) झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडून १ किलो ९३ ग्रॅम गांजा मिळाला. त्याची किंमत सुमारे ५४ हजार ६५० रुपये आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. अटक केलेल्या आरोपीचे नाव जंगू कुंभरे (५१, रा. बैलमपूर, ता. राजुरा) आहे. त्याच्याविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास गडचांदूर पोलीस करत आहेत. (चंद्रपुरात भररस्त्यात खून, वाचा बातमी)
गडचांदूर गांजा जप्त: पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या बातमीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून धाड टाकली. या कारवाईदरम्यान संशयित इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो ९३ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी तत्काळ गांजाचा साठा जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले. जंगू मारोती कुंभरे (वय ५१ वर्ष, रा. बैलमपूर, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे गडचांदूर येथे आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ५०८/२०२६, कलम ८(क), २०(ब)(II)(ब) अमली पदार्थविरोधी कायदा (NDPS Act) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला रीतसर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास गडचांदूर पोलीस करत आहेत.
सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच राजुरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणि गडचांदूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद बनबले यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, नापोअ बलवंत शर्मा, पोअ सुरज ढोले, पोअ प्रकाश बाजगीर, पोअ साईनाथ उपरे, पोअ मनोहर जाधव, पोअ पराग राजूरकर आणि मपोअ कविता पळनाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे भागातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






