चंद्रपूर मनपात खळबळ! १.३० लाखांची लाच घेताना इंजिनिअर जाळ्यात, मनपातील लाच प्रकरणाची माहिती देण्यासाठी 'एसीबी'ची टाळाटाळ

February 21, 2026 by Prakash Hande

ACB Raid Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेतील नगर रचना विभागात कार्यरत असलेला एक कंत्राटी अभियंत्याला लाच घेतांना अटक करण्यात आल्याची घटना चंद्रपुरात घडली मात्र या लाच प्रकरणातील अधिक माहिती देण्यास येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून टाळाटाळ केली जात होती. घटना घडूनही प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. (चंद्रपूरचा नटवरलाल, बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक)

 

चंद्रपूर मनपात नुकतीच राजकीय पक्षाची सत्ता स्थापन झाल्याच्या महिनाभरात कर्मचाऱ्यांनी कमाई सुरु केली का? असा प्रश्न लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे. 
चंद्रपूर महानगर पालिकेतील नगर रचना विभागात कार्यरत असलेले कंत्राटी अभियंता शुभम यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा प्रभार होता, अशी माहिती आहे. अतिक्रमण विभागातील एका प्रकरणात या अभियंत्याने १ लाख ३० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली त्यावरून आज सांयकाळी लाच घेतांना अभियंता शुभम याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली मात्र रात्री उशीरापर्यंत सबंधित विभागाकडून माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात होती, हे विशेष.

 

वृत्त व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना अधिकृत माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला मात्र प्रतिसाद देण्यात आला नाही, एखादी कारवाई झाली तर संबंधित विभागाकडून काही वेळेत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येते मात्र प्रथमच कारवाई झाल्यावर बराच वेळ झाल्यावर सुद्धा संबंधित विभाग जाणीवपूर्वक माहिती देणे टाळत आहे.

1 Comments

2 months ago

दिनांक. तरी टाकत जा

Leave a Comment

+