राज्यात तिसरा! चंद्रपूरच्या 'अम्मा की पढाई' केंद्रातील विद्यार्थ्याचा PSI परीक्षेत डंका

March 07, 2026 by Prakash Hande

Amma Ki Padhai Shiksha Kendra : चंद्रपूर - गरिब व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि निशुल्क शिक्षण मिळावेया उदात्त उद्देशातून आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या अम्मा की पढाई शिक्षा केंद्राचा आणखी एक विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. या केंद्रातील विद्यार्थी पुण्यदीप शिलारकर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली आहे. पुण्यदीप शिलारकर यांचे यश हे जिद्दपरिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. (रामसेतू पुलाखाली आढळला वृद्धाचा मृतदेह)

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत सध्या २८४ विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि अनुभवीउच्चशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा परीक्षांचे निशुल्क प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनविण्याचा या उपक्रमाचा उद्देश असूनया केंद्रातून अनेक विद्यार्थी आज विविध` शासकीय सेवांमध्ये स्थान मिळवत आहेत.

 

पुण्यदीप शिलारकर यांची यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यकर निरीक्षक पदावर निवड झाली होती. त्यानंतरही त्यांनी जिद्द आणि परिश्रम कायम ठेवत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीत उत्कृष्ट गुण मिळवले आणि अंतिम यादीत स्थान मिळवले. विशेष म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातून संपूर्ण राज्यात तिसऱ्या क्रमांकाने त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.

 

पुण्यदीप यांच्या या यशामुळे अम्मा की पढाई शिक्षा केंद्र’ या उपक्रमाची ताकद आणि परिणामकारकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशाआत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळत आहे.

 

पुण्यदीप शिलारकर यांचे यश हे केवळ त्यांच्या कष्टांचे फळ नसून अम्मा की पढाई शिक्षा केंद्र’ या उपक्रमाच्या प्रेरणादायी कार्याचे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची नवी प्रेरणा मिळत आहे.

 

अम्मा की पढाई शिक्षा केंद्र’ या उपक्रमातील विद्यार्थी पुण्यदीप शिलारकर यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर झालेली निवड ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून त्यांच्या यशामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढला आहेअशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

 

आमदार जोरगेवार म्हणाले कीपुण्यदीप यांचे यश हे त्यांच्या जिद्दकठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. ग्रामीण व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास तेही मोठ्या पदांवर पोहोचू शकतातयाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

Leave a Comment

+